नाशिक : मालेगावचे (Malegaon) माजी आमदार रशीद शेख (Former MLA Rashid Shaikh) यांचे सोमवारी (4 डिसेंबर ) रात्री निधन झाले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा (Rashid Shaikh Passes Away) श्वास घेतला. ते 65 वर्षाचे होते. अलीकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मालेगावच्या रुग्णालयात दाखल होते. परंतु त्रास वाढल्यानंतर नाशिकच्या (Nashik News) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते. 1999 मध्ये रशीद यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून धक्का दिला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता.ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. याच पार्श्वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
सकाळी 11 वाजता दफन विधी होणार
2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. तत्पूर्वी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले होते. काँग्रेस शासन कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.त्यांची कै.खलील दादा यांचे घर, गल्ली नं. एक हजार खोली येथून अंत्ययात्रा निघणार आहे. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वा दफन विधी होणार आहे. समंजस आणि समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. राशिद शेख यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय
राशीद शेख यांचा काँग्रेसला रामराम हा आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात होता. आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढच नव्हे तर, रशीद शेख हे सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडं खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले होते.
हे ही वाचा :
Vinod Thomas: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 45 व्या वर्षी निधन; कारमध्ये आढळला मृतदेह