Raj Thackeray Nashi Visit नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये होणार आहे. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होणार आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकच्या काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir) दर्शन घेऊन प्रभू श्रीरामाची आरती देखील करणार आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व वाढले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. 22 जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकला हजेरी लावली होती. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील अलीकडेच नाशिक दौरा केला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये तळ ठोकून होते. 


मनसे फुंकणार निवडणुकीचे रणशिंग


आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. एकेकाळी नाशिकची मनसेचा (MNS) बालेकिल्ला अशी ओळख होती. त्यामुळे आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) व विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) नाशिकमधूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे. 


तीन दिवस नाशिक होणार मनसेमय


या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेचे दि. 07, 08 आणि 09 मार्चला भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सात मार्चला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये येतील. आठ मार्चला सकाळी मनसेत काही प्रवेश होतील. त्यानंतर नऊ मार्चला मनसेच्या वर्धापनदिनी दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होईल.  पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहतील. 


काळाराम मंदिराचे महत्व वाढले


नाशिकचे काळाराम मंदिर (Kalaram Mandir) हे पौराणिकदृष्ट्या तर महत्वाचे आहेच. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्याही काळाराम मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काळारामाचे दर्शन घेतले होते. तर 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काळारामासमोर नतमस्तक झाले. आता राज ठाकरे देखील काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन मनोभावे आरती करणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरूय, मराठा समाजानं जागरूक राहावं; राज ठाकरेंचा इशारा


Sharad Pawar : मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्यास मला आनंद : शरद पवार