Dada Bhuse on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विधेयकाचा मुसदा विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे आरक्षण टिकणारे मजबूत असे आरक्षण आहे. मराठा समाजाचा संघर्ष आता संपला असल्याची प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली आहे. 


दादा भूसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज मराठा समाजाला 10 टक्के नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाल्याने आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आपली शपथ पूर्ण केली आहे. 


कुठल्याही समाजाला धक्का न लावता दिले स्वतंत्र आरक्षण


जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्त घरांमध्ये जावून सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. आयोगाने दिलेल्या अहवालातील शिफारशी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आहेत. हे सर्व करत असताना कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे स्वतंत्र आरक्षण दिले आहे. 


मराठा समाजाचा संघर्ष आता संपलाय


यामुळे समाजात तेढ होणार नाही यासाठी आपल्या सरकारने सर्व बाबींचा विचार करून टिकणारे आरक्षण दिले आहे. हे आरक्षण टिकणारे मजबूत असे आरक्षण आहे. मराठा समाजाचा संघर्ष आता संपला असल्याची प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे.  


उद्धव ठाकरेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार


सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते. मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता देखील आरक्षण देता येईल. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो. 


काय म्हणाले एकनाथ शिंदे


मराठा समाजाला आरक्षणामध्ये अडचणीत आल्या होता. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कोणालाही धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने आरक्षण देणार हा शब्द दिला होता. बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे, शब्द दिला की तो पूर्ण करायचाच. जरांगे यांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांना आरक्षण देणार आहे असे शब्द दिला होता. मागे देखील मी शब्द दिला आणि त्यानंतर तो पूर्ण केला. आता मागचा इतिहास पुढे आणणार नाही. आज माझं तोंड कडू करणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल