नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात भेट दिलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram Temple) आता राहुल गांधीही (Rahul Gandhi) भेट देणार आहेत.  राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.  राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यानुसार 10 मार्चला नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. पाच जिल्ह्यातून प्रवास करत 13 मार्चला मुंबईतल्या चैत्य भूमीवर यात्रेचा होणार आहे. दरम्यान, चार दिवसाच्या यात्रेत 11 किंवा 12 मार्चला राहुल गांधी यांचे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन नियोजीत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राहुल गांधी काळाराम मंदिरला भेट देणार आहे.


नाशिक येथील पंचवटीत काळ्या दगडात बांधलेले काळाराम मंदिर सुप्रसिद्ध मंदिर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदी आणि उद्धव ठाकरेंनी या मंदिराला भेट दिली होती. आता राहुल गांधी सुद्धा या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला  महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या काळात राहुल गांधी काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. यावेळी राज्यातील महत्वाचे काँग्रेस नेते त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांचा राज्यातील हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. 


मोदींच्या हस्ते झाली होती महाआरती...


मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. यावेळी येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले होते. मंदिरात दाखल झाल्यावर मोदींनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली होती. आरतीनंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली होती. मोदींच्या याच नाशिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आता मोदींनंतर राहुल गांधी नाशिकचा दौरा करत काळाराम मंदिराला भेट देण्रा आहेत. 


एकूण 6 हजार 713 किलोमीटरहून अधिकचा प्रवास 


महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार असून, 479 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. मालेगाव येथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून, नाशिकमार्गे ठाणे येथे यात्रेचं समारोप केला जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत 15 राज्यांमधून जाणार आहे. ज्यात एकूण 6 हजार 713 किलोमीटरहून अधिकचा प्रवास बसने आणि पायी केला जाणार आहे. यामध्ये 110 जिल्हे, सुमारे 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 66 दिवस लागणार आहे. 


इतर  महत्वाच्या बातम्या : 


Rahul Gandhi : 'हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं?' विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं...