PM Narendra Modi नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी 'जन मन कार्यक्रमा'अंतर्गत (Jan Man Yojana) दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकलव्य शाळेतील (Eklavya School) विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  


भारती रण (Bharati Ran) आणि भाऊसाहेब रण (Bhausaheb Ran) या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद मोदींनी गप्पा मारल्या. मोदींनी त्यांच्याशी मराठीतून देखील संवाद साधला. मी नुकताच नाशिकला (Nashik) येऊन गेला, तुम्हाला माहिती आहे का? काळाराम मंदिरातही (Kalaram Mandir) स्वच्छता केली? आपल्याला माहिती आहे का? असे प्रश्न त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विचारले.


आम्हाला तुला सलाम ठोकावा लागेल - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठेपणी तुला काय बनायचे आहे असा प्रश्न भारती रण या विद्यार्थिनीला विचारला. यावर विद्यार्थिनीने मला आयएएस अधिकारी बनायचे आहे, असे म्हटले. त्यावर मोदी म्हणाले की, मग आम्हाला तुला आम्हाला सलाम ठोकावा लागेल. मोदींनी असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना काही मिश्कील प्रश्नदेखील विचारले. 


विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद


जवळपास पाच ते सात मिनिट ही चर्चा रंगली होती. पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएम जनमन योजनेत पक्के घरे, वसतिगृह आणि वीज जोडणी योजनेसह विविध योजनांचा लाभ झाल्याचे यावेळी सांगितले.


सात राज्यातील लाभार्थ्यांशी साधला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सात राज्यातील लाभार्थ्यांशी जन मन कार्यक्रमांतर्गत संवाद साधला. यावेळी राज्यभरातून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्याची निवड करण्यात आली होती. इगतपुरी तालुक्यात असलेल्या कावनई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


काय आहे पीएम-जनमन योजना?


देशातील आदिवासी आणि आदिम जमातींच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम जन-मन योजनेअंतर्गत जे लोक जंगलात राहतात आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही अशा सर्व लोकांना सरकारकडून सर्व मूलभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधी प्रदान केल्या जातात.


पंतप्रधान जन-मन योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी 24000 कोटी रुपयांच्या बजेटसह ही योजना सुरू केली. प्रधानमंत्री जनमान योजनेच्या माध्यमातून सरकार आदिवासींना आरोग्य आणि पोषण तसेच राहणीमान यासारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. 


आणखी वाचा 


National Youth Festival : पीएम मोदींची पाठ फिरताच राष्ट्रीय युवा महोत्सव पोरका; प्रशासनाच्या असमन्वयाने युवकांना फटका