NEET Exam 2025 : मेडिकल अभ्यासक्रमांसाठी देशभरात होणारी NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा आज 4 मे 2025 रोजी पार पडली. मात्र, या परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही केवळ काही मिनिटांच्या उशिरामुळे नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले.

Continues below advertisement

परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी, सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान 1.30 वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक असल्याचे सूचना पत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर दीड वाजेनंतर म्हणजेच निर्धारित वेळेच्या काही मिनिटांनी केंद्रावर दाखल झाल्या. 

विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला 

परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्राच्या अधिकार्‍यांकडे विनंती केली. मात्र परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्याने त्यांना परीक्षा द्यायची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे विद्यार्थिनींचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब

दरम्यान, नाशिकच्या मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब झाल्याचे दिसून आले. बायोमेट्रिकसाठी तांत्रिक अडचणीत येत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे परीक्षा केंद्रावर सुमारे एक तास विद्यार्थी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. मात्रम बायोमेट्रिकचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बायोमेट्रिक न झाल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. तर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. हातातील दोरे, पाण्याच्या बाटलीचे स्टिकर आणि पायातील चप्पल देखील काढून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत सोडले जात होते. विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचाव व्हावा यासाठी परीक्षा केंद्रावर प्राथमिक उपचार साधनसामुग्री देखील ठेवण्यात आली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Board HSC Results 2025 मोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; निकाल कुठे पाहता येणार?, पाहा A टू Z माहिती

मुख्यध्यापिका अन् शिक्षिका यांच्यात तुंबळ हाणामारी; केस ओढले, कानफटात मारली, शाळेच्या आवारातच जुंपली, VIDEO


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI