Nashik News:नाशिक (Nashik) शहरातील सातपूर कॉलनी (Satpur Colony) परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, जीर्ण अवस्थेतील घराची भिंत अचानक कोसळल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

मृत बालकाचे नाव मोहमद उजेर खान असे असून ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाजवळ असलेल्या एका जुन्या आणि धोकादायक अवस्थेतील घराची भिंत अचानक कोसळली. त्या वेळी जवळच खेळत असलेला उजेर खान याला भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गंभीर दुखापत झाली.

Nashik News: नागरिकांची धावपळ, मात्र प्रयत्न अपुरे

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बालकाला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Continues below advertisement

Nashik News: सातपूर पोलीस ठाण्यात नोंद

दरम्यान, या प्रकरणाची नोंद सातपूर पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर सातपूर कॉलनी परिसरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात अनेक घरे व इमारती जीर्ण अवस्थेत असून त्यांची वेळोवेळी तपासणी होत नाही. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून धोकादायक बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून अशा घटना टाळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra ATS Action: फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड

Bhigwan Kidnapping Case: पाच दिवसावर लग्न, आई अन् भावावर टाकली मिरची पूड टाकत तरुणीचं अपहरण, कारवाईला वेग येताच तरुणीने व्हिडीओ शेअर केला अन्...; भिगवण प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?