नाशिक: राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. एक एक मतदारसंघासाठी युती आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच नाशिकचे महत्व कमालीचे वाढले आहे. नवनवर्षाचा पहिला महिना तर नाशिकसाठी पॉलिटिकलं ब्लॉकबस्टर ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi),  गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे सर्वच राजकीय पक्षाचे नेते नाशिकचे मैदान गाजवणार आहेत. त्यातच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)  यांचे पुत्र धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्यानं शिवसेना भाजपात धुळे आणि नाशिकच्या जागेबाबत अदलाबदल होते का याकडे लक्ष लागले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जागेची शोधाशोध.. तर कुठं शिवसेना उबाठा गटाच्या अधिवेशनासाठी जागेची चाचपणी केली जात आहे.  मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या खांद्यावर तर शिवसेना अधिवेशनाची जबाबदारी उत्तर महारष्ट्र संपर्क नेते नाही शिवसेनेचे फायर ब्रँड संजय राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन  पंतप्रधान  नरेंद मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला होणार आहे. तर शिवसेना उबाठा गटाचे राज्यस्तरीय महा अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये भरवले जाणार आहे. नाशिकमध्ये दोन्ही पक्षाकडून जय्य्त तयारी केली जात आहे. 1994 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नाशिकमध्ये अधिवेशन झाले होते.  त्यानंतर राज्यात 1995  मध्ये शिवशाहीचे सरकार आले होते.  कुंभमेळा आणि रामभूमी अशी नाशिकची ओळख असल्यानं राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याआधीच मोदी नाशिकमध्ये येणार आहेत. 


अनेक नेत्यांचे दौरे


पंतप्रधान मोदींच्या (PM Modi)  दौऱ्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात गृह आणि सहकार मंत्री अमित शहा सहकार  परिषदेसाठी नाशिकमध्ये येणार आहेत.  या दोन्ही नेत्याच्या दौऱ्या दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाचा  आढावा  घेण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  पोलीस दलाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने  उपमुख्यमंत्री  अजित पवार नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 8 ते 10  दिवसाच्या फरकाने  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये येत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही  सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंना नाशिकमध्ये आणण्याची तयारी सुरु झाली आहे. 


ऐन हिवाळ्यात नाशिकचे राजकीय वातावरण तापले


राज्याच्या राजकारणात नाशिक कायमच आकर्षणाच्या  केंद्रस्थानी राहिले आहे . कधी राज ठाकरेच्या मनसेमुळे  तर कधी भुजबळांच्या  तर कधी शिवसेना भाजपा युतीच्या संयुक्त प्रभावामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय  पक्ष नाशिकमध्ये ताकद आजमावत असल्यानं नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. त्यामुळे ऐन  हिवाळ्यात नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापवू लागले आहे.


महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून जागेसाठी मोर्चेबांधणी


शिवसेना  शिंदे गटाचे हेमंत गोडसे नाशिकचे विद्यमान खासदार 45 प्लसचे स्वप्न पूर्णकरण्यासाठी  भाजपकडून नाशिकच्या जागेबाबत  सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिंकून येणायची क्षमता असणाऱ्यालाच उमेदवारी दिली जाणार असलयाचे संकेत दिले जात असल्यानं  महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.अशीच परिस्थिती महाविकस आघाडीच्या ठाकरे आणि शरद पवार गटात ही बघायला मिळत असल्यानं उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.  त्यातल्याच पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे  धुळे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्यानं भाजपाकडे असणारी धुळ्याची जागा आणि शिवसेना शिंदे गटाकडे असणाऱ्या नाशिकच्या जागेत अदलाबदल होते का याबाबतही राजकीय  वर्तुळात चर्चांना उधाण आलाय.. पालकमंत्र्यांच्या पुत्राच्या हट्टासाठी शिवसेना नाशिकच्या जागाईवर पाणी सोडेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर भाजप नाशिकसाठी आग्रही आहे. त्यामुळे युती आघाडीच्या जागावाटपाकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.


हे ही वाचा :