North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, क्रीडा, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषदेत उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या हस्ते करून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यंदा नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच 437 गावे आणि वाड्यांना आताच 136 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा अल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच जायकवाडीला नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालावली आहे.
गुजरातमधील सुरत येथे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1 लाख 8 हजार रुपयांच्या विदेशी मद्यासह सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा सुमारे 13 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना आता एबीसीडीपासून सुरुवात करायची आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच एक गट पक्ष फोडतो तर दुसरा गट घर फोडतो अशा प्रकारची टीका शरद पवार गटाच्या वतीने भाजपवर केली जात आहे, यावरदेखील गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा व महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शिवस्मारक, जिल्हा न्यायालयासमोर, जुने सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, महानगरपालिका उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, विजयकुमार मुंडे तहसिलदार सामान्य प्रशासन विभाग मंजुषा घाटगे, यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपलिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, क्रीडा, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -