North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा इथे...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अनिरुद्ध जोशी Last Updated: 18 Feb 2024 06:18 PM
लासलगावसह पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'हे' आहे कारण

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणी योजनेचे ३२ लाख रुपये वीज बिल थकल्याने लासलगावसह अन्य पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नागरिक पाण्यापासून वंचित झाले आहेत. 

कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर भारती पवारांची प्रतिक्रिया

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अमित शाह यांच्यासोबत आज मीटिंग झाली होती. त्यानंतर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.  हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.

एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत ऑपरेटरला पकडले रंगेहाथ

एक लाखांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह ग्रामपंचायत ऑपरेटर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. चुंचाळेचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी,  (ता. यावल जि. जळगांव) व ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुळकू कोळी (35 रा. चुंचाळे ता. यावल) अशी लाचखोरांची नावे आहेत

भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार यांच्यावर नाशिकच्या येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एकलहरा रोडवर अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलहरा परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.  धारदार शास्त्राने वार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मृतदेहाची ओळख पटविणे आणि हल्लेखोरचा तपास सुरू झालाय.

किकवारी खुर्द येथील जवानाचे निधन

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथील जवान राकेश गोकुळ काकुळते यांना गुजरातमधील सुरत येथे कर्तव्य बजावतांना निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर किकवारी खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जानेवारी 2004 मध्ये ते मराठा बटालियन तुकडी 114 मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अनेक मार्गात बदल

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात भद्रकाली परिसरातून मुख्य मिरवणुकीसह पाथर्डी फाटा, पंचवटी आणि नाशिकरोडला भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.19) दुपारी बारा वाजेपासून मध्यरात्री बारापर्यंत हे बदल लागू असतील आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॅरकेडिंग करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.