North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, सामाजिक, क्रीडा, महत्वाच्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील व्यावसायिकास तब्बल तीन कोटी 70 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी केल्यात. गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हे घडले याची दखल घेत आज बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात मोनिका राउत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बछाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे यासाठी पोलिसिंग वाढविण्याच्या सूचना केल्या असून, दामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा , तसेच अवैध धंदे तातडीने बंद करून मला शहरात शांतता हवी आहे त्यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी केल्यात. येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना केल्यात. शहरातील ब्लॅक स्पॉट शोधून कोंबिंग करून सराईत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याची सूचना यावेळी केली आहे. जे दोषी व उपद्रवी असतील त्यांची धिंड काढण्याची सूचना दिली.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आढावा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली आहे. मात्र या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सिंहस्थ आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली होती.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, सामाजिक, क्रीडा, महत्वाच्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -