North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अनिरुद्ध जोशी Last Updated: 17 Feb 2024 07:03 PM
Malegaon : मालेगाव मनपा अ‍ॅक्शन मोडवर, नऊ गाळ्यांना ठोकले सील

मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुल करतानाच पाणीपट्टी व संकीर्ण कर वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील सोमवार बाजार व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी नऊ गाळे सील करण्यात आले आहेत. 

शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करा : छगन भुजबळ

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प (Shivsrushti Project) अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावी, अशा सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

भुसावळमध्ये बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ पथकाने ओझरखेडा शिवारातील तलावा जवळील एका खासगी शेतात छापा टाकत बनावट देशी, विदेशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत एका संशयितासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

नांदगावला महिलेची रस्त्यावरच प्रसूती

ऊसतोड मजूर असलेली महिला आपल्या सासू-सासऱ्यांसोबत कारखान्यावरून दुचाकीवर घरी परतत असताना शहरातील जुन्या रेल्वे फाटकाजवळ तिला असह्य अशा प्रसूती वेदना जाणवू लागल्या. जागरूक नागरिक व काही महिला पुढे आल्या आणि तिथेच कापड आडवी धरून तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. एका सुंदर व गोंडस अशा मुलीला तिने जन्म दिला. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राम शिंदे यांनी तिची नाळ बाजूला करत पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात तिला भरती केले. 

नाशिक-मुंबई महामार्गावर रास्ता रोको

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने नाशिक-मुंबई महामार्गावर आडगावजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.   

Nashik NMC : नाशिक महापालिकेचा 2 हजार 603 कोटींचा अर्थसंकल्प सादर

नाशिक महानगरपालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ नसलेला 2 हजार 603.49 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Nashik NMC Budget) सादर करण्यात आला आहे. यात नावीन्यपूर्ण उपाय योजनांतून उत्पादन वाढीसांठी नवनवीन प्रयोग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.