North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, ताज्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिकमध्ये ग्रामसभेला सुरवात झाली आहे. गोदावरीची आरती कोणी करावी? या वरून सध्या वाद सुरु आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 19 तारखेपासून गोदावरी आरती सुरू होणार आहे. वंश परंपरेनुसार पुरोहित संघाला आरतीचे अधिकार द्यावेत, अशी पुरोहित संघाची मागणी आहे. तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रामतीर्थ समितीला आरतीचे अधिकार देण्याची मागणी होत आहे. यावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
नदीतील पाण्याचे मोटर चोरी करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश आले आहे. संशयितांकडून चोरीची मोटर हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप मोरे (31), संतोष रमेश कापसे (30, दोघे रा. ओढा गाव ता. जि. नाशिक), बारकू कापसे (31, शिलापूर ता. जि. नाशिक) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भिमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर 138 मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ उडाली. हातातली कामे सोडून सर्वजण दूर पळाले. मात्र बिबट्या हालचाल करत नसल्याने हिम्मत धरत काही तरुण जवळ गेले असता तो मृत झाल्याचे आढळून आले.
आदित्य ठाकरे हे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये ते आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दौऱ्यांचे नियोजन केले जात आहे.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, ताज्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -