North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा, ताज्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मालेगाव : मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे आज गुरुवारी मालेगाव तालुक्यातील मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वऱ्हाणे आदी गावांच्या दौऱ्यावर होते. मात्र यावेळी मालेगाव तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. पंकज भुजबळांचा दौरा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आला.
नांदगाव शहरातील महात्मा फुले चौकातील फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया झाली. यात लिलावातून पालिकेच्या महसुलात कोट्यवधीची भर पडली. लिलावातून पालिकेला पाच कोटी महसूल मिळाला.
नाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्त संप्रदा बीडकर यांनी नुकताच जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडून स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. नाशिकला येण्यापूर्वी संप्रदा बीडकर या सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर, बीड, सोलापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर डहाणू येथे माहिती अधिकारी पदावर सेवा बजावली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिकमध्ये ऐन फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच आता नाशिकमधील गंगापूर रोड कॉलेजरोड परिसरासह काही भागात उद्या शुक्रवारी (दि. 23) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न डोकं वर काढणार आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा गत वर्षाच्या तुलनेत 23 टक्याने कमी झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व धरणात 67.79 टक्के उपयुक्त पाणीसाठा असताना आज केवळ 44.28 टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिकच्या गंगापूर धरणात आजमितीस 61 टक्के पाणी शिल्लक असून मागील वर्षी हाच साठा 74 टक्क होता, दारणा धरणात 43 टक्के पाणीसाठा आहे,मागील वर्षी 78 टक्के, पालखेड मध्ये 26 टक्के आजमितीला तर मागिल वर्षी 51 टक्के होता, गिरणा धरणात 35 टक्के असून मागील वर्षी 56 टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मणिकपुंज धरणात अवघा 21 टक्के पाणीसाठा असून मागिल वर्षी 42 टक्के पाणीसाठा आहे, जिल्ह्यातील174 गाव आणि 385 वाड्याना 170 टॅन्करच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे, ही संख्या पुढील महिन्यात वाढणार आहे.
गंगापूर रोड श्रमिकनगरमध्ये काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता जुन्या नाशकात अज्ञात समाजकंटाकांकडून सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पाच दुचाकी, एक छोटा हत्ती आणि एक हातगाडी अशा सात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा, ताज्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -