North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अनिरुद्ध जोशी Last Updated: 11 Feb 2024 07:13 PM

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये......More

अहमदनगरच्या पाथर्डीत कावळ्यांचा मृत्यू, पक्षीमित्रांनी व्यक्त केली चिंता

अहमदनगर : पाथर्डी शहर आणि परिसरामध्ये मागील आठ दिवसांपासून अज्ञात कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पक्षीमित्रांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने कावळ्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत शोध घेणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये कावळे बेशुद्ध पडत असून बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान,  परिसरात पक्षी तज्ञ अथवा पक्षांवर उपचारासाठी पद्धत नसल्याने संबंधित यंत्रणांनी कावळ्यांच्या मृत्यूबाबत शोध घेण्याची मागणी पक्षी मित्रांकडून होत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने कावळ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. मात्र, पक्ष्यांचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.