पेठ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यातच आता पेठ (Peth) तालुक्यातील डेरापाडा (Derapada) गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्मशानभूमीला (Cemetery) शेड नसल्याने मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सरणावर छत्री व ताडपत्री धरून मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागतं असल्याची परिस्थिती आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 


उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ


डेरापाडा वासियांना स्मशानभूमीला निवारा शेड नसल्याने भरपावसात सरणावर येणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी छत्र्यांचा व ताडपत्रीचा आसरा घेतला आणि मृतदेहावर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागतं असल्याची परिस्थिती आहे. डेरापाडा गावात स्मशानभूमीला अंत्यसंस्कार विधीसाठी निवारा शेड लवकरात लवकर बांधून मिळावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर माणसाने वेदना सोसाव्या तरी किती? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 


पालघरमध्येही अशीच परिस्थिती


दरम्यान, मागील महिन्यात पालघरमध्ये जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. पालघरमधील डहाणूच्या सोनाळे खुबरोडपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने सरणावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 56 वर्षीय जयराम झिरवा यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी नातेवाईकांना प्लास्टिक खाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे दिसून आले आहे. अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांसह गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. महसुली गावाची असलेली स्मशानभूमी पाड्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे मुसळधार पावसात प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ उद्भवली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


पत्नीला ड्रग्ज देऊन भयंकर कृत्य, 51 जणांनी आळीपाळीने केला अत्याचार; रस्त्यावरुन जाणाऱ्या माणसांना नवराच द्यायचा ऑफर


Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचं आमिष भोवलं, बँक मॅनेजरला 40 लाखांचा गंडा तर तिघांची तब्बल 93 लाखांची फसवणूक