Maharashtra Nashik News: राज्यात सत्तांतर (Maharashtra Political Crisis) घडवून आणल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच नाशिक शहरात (Nashik News) पक्षीय अधिवेशनाच्या निमित्ताने येत आहेत. भाजपच्या (BJP) दोनदिवसीय प्रदेश बैठकीसाठी ते नाशिकमध्ये (Nashik) येत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भागवत कराड (Bhagwat Karad), कपिल पाटील (Kapil Patil), डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांच्यासह ज्येष्ठ नेते राम नाईक, राज्यातील ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), गिरीश महाजन (Girish Mahajan), अतुल सावे (Atul Save), सुरेश खाडे (Suresh Khade) अशी भाजपच्या नेत्यांची मांदियाळी शुक्रवारी आणि शनिवारी नाशिकात अवतरणार आहे.
गत विधानसभा निवडणुकांवेळी जाहीर सभेत नाशिकला दत्तक घेत असल्याच्या त्यांच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी नाशिकवरील विशेष स्नेह दर्शवला होता. दरम्यान, राज्यात सत्ताबदल घडवून आणल्यानंतर ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमासाठी नाशिकला आले नव्हते. सत्ताबदलानंतर त्र्यंबकेश्वरजवळील (Nashik Trimbakeshwar News) एका निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनासाठी आणि विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते. मात्र, ते कार्यक्रम खासगी दौऱ्याचा भाग होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने पक्षीय दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकला येत आहेत.
दरम्यान, एकाच वेळी केंद्रातील बहुतांश मंत्री आणि राज्यातील भाजपचे सर्व मंत्री हे नाशिक दौऱ्यावर (Nashik Political News) येणार असल्याने नाशिकची जबाबदारी सोपविलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan News), भाजपचे स्थानिक आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande ), सीमा हिरे (Seema Hiray), राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तयारीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी झटत होते. या अतिविशेष व्यक्तींच्या दिमतीखातर जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेचीही दमछाक उडणार आहे.
प्रदेश कार्यकारिणीचे पहिलेच अधिवेशन
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) हे गतवर्षी नाशिक दौऱ्यावर रवाना होत असतानाच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीचे पहिलेच अधिवेशन नाशिकला होण्याचा योगायोग देखील या निमित्ताने जुळून येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sharad Pawar at Nashik : शरद पवार आज नाशकात, वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार