Nashik News: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुलं मुलींना (14 boys and girls) जन्म दिला. या महिलेने मुलांचे संगोपन होत नाही आर्थिक अडचण आणि मुलांना आजारपणात योग्य उपचार मिळत नाही यामुळे 14 मुला मुलींपैकी (14 boys and girls)सहा मुलं आणि मुली विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला. या घटनेने एकाच खळबळ उडाली असून पैशांसाठी पोटच्या मुलाला विकल्याचा संशय व्यक्त झाल्याने यंत्रणादेखील खडबडून जागी झाली. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....

बच्चीबाई हाडोंगे याच महिलेने आणि तिच्या पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचे उघडकीस झाले आहे. अंगणवाडी सेविकांनी दत्तक पत्राच्या आधारे जन्म दाखला बनविल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. महिला बालविकास विभागाच्या चौकशी समितीत काय समोर येते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik News: नेमकं प्रकरण काय?  

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासी बहुल पाड्यात वावी हर्ष येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. 45 वर्षीय बच्चुबाई हंडोगे यांना तब्बल 14 मुले झाली आहेत. या पैकी सहा पेक्षा जास्त मुली आणि मुले पैशासाठी विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 10 ऑक्टोबर 2025 रोजी या महिलेला एक मुलगा झाला. नवजात बाळाचे वजन कमी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांमार्फत त्याची घरपोच आरोग्य तपासणी सुरू होती. मात्र, महिलेने मुलाचे संगोपन केले नसल्याने बाळ विकल्याची माहिती आशा कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. जेव्हा स्थानिक आशा सेविकांनी बाळाची आरोग्य तपासणी करण्यासाठी घरात भेट दिली, तेव्हा महिलेने नवजात बाळ विकल्याचे सूचित केले. याआधीदेखील दोन ते तीन लहान मुले विकल्याची माहिती मिळाल्याचे संशय उपस्थित केला गेला. आमच्या टीमने या आदिवासी पाड्यावर पोहोचून संपूर्ण प्रकार जाणून घेतला, आणि हा प्रकार नेमका काय आहे हे स्थानिक आशा सेविकेकडूनच समजले.

Continues below advertisement

आरोग्य तपासणीसाठी बाळ कुठे आहे, असा प्रश्न विचारल्यावर महिलेने आशा सेविकेला बाळ देऊन टाकल्याचे सांगितले. याआधीही अशा प्रकारच्या दोन ते तीन घटना घडल्यामुळे आशा सेविकांचा संशय वाढला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती दिली. डॉक्टरांकडून ही माहिती मिळताच घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. घडलेल्या घटनेमुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनाही माहिती मिळाली. महिलेने कोणतीही मदत मिळवली नव्हती आणि आर्थिक अडचणींमुळे बाळाचे संगोपन शक्य नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे जन्मदात्या आईनेच नवजात बाळ विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 

आणखी वाचा 

लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात