Nashik: नाशिक शहरातील बिडी भालेकर (Bidi Bhalekar School) ही 1968 सालात नाशिक शहरात नगरपालिका असताना पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून उभी राहिली. बिडी भालेकर या एका हॉकर्स कामगाराने शाळा उभारण्यासाठी आयुष्यभराची कमवलेली जमापुंजी आणि जमीन नगरपालिकेला शाळेसाठी दान केली होती. मात्र शाळा बंद असल्याचं कारण देऊन महापालिका प्रशासनाने शाळेच्या जागी विश्रामगृह उभारण्याचा घाट घातला आहे. पालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात स्थानिकांकडून कडाडून विरोध दर्शवला जातोय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात मराठी शाळा शेवटच्या घटका मोजत असताना यावरून अनेक तर्क- वितर्क लढवले जात आहे. काय आहे नाशिकच्या बिडी भालेकर शाळेचा प्रश्न पाहूया आमच्या स्पेशल रिपोर्ट मधून...
शाळा पडून विश्रामगृह बांधण्याचा निर्णय
नाशिकच्या मध्यवर्तीय भागात पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षाची बिडी भालेकर शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय. मात्र ही महापालिकेची शाळा शहराच्या इतिहासातील पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून उदयास आली होती. मात्र या शाळेच्या ठिकाणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आणि या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांसह माजी विद्यार्थी एकत्र येऊन बचाव समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत. या शाळेची सध्या अतिशय बिकट अवस्था झालेली आहे बिडी भालेकर शाळा, बिडी भालेकर मैदान, कालिदास कला मंदिर हे शहरातील नावाजलेले परिसरातील वास्तू मात्र भांडवलदारांच्या फायद्यासाठी पालिका प्रशासनाकडून असे निर्णय घेतले जात असल्याचा बचाव समितीच्या माध्यमातून आरोप केले जात आहे. महापालिकेच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील बचाव समितीसह माजी विद्यार्थ्यांनी दिलाय.
या शाळेचा थोडक्यात इतिहास
नाशिकच्या या बिडी भालेकर शाळेच मोठे महत्त्व आहे. गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी एक स्थानिक गृहस्थ पुढे आले त्यांचे नाव बिडी भालेकर. कोणीही वारस नसल्याने त्यांनी आयुष्यभराची जमवलेली कमाई आणि संपत्ती दान दिली आणि त्यातून नाशिकमधली पहिली मराठी माध्यमिक शाळा महापालिकेच्या माध्यमातून उभी राहिली. भालेकर यांचे सहकारी शांताराम चव्हाण यांनी ही शाळा उभी राहण्यासाठी भालेकर यांनी काय केलं आणि त्यातून कशीही शाळा उभी राहिली या संदर्भात देखील सविस्तर माहिती दिली.
मंत्री दादा भुसे काय म्हणाले?
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांनी या प्रकरणात बचाव समितीने मांडलेला मुद्दा ग्राह्य धरून या ठिकाणी पुन्हा शाळाच उभेरावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मात्र अनेक वर्षांपासून या शाळेत विद्यार्थी नाही आणि त्यामुळे ही शाळा बंद आहे तर शाळेची इमारत देखील जीर्ण झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने मंत्री दादा भुसे यांना दिले मात्र हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जात यावर तोडगा काढू असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले.
50 वर्षे जुनी शाळा मोजतेय शेवटच्या घटका
पन्नास वर्षापासून जुनी असलेली ही बिडी भालेकर शाळा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. या शाळेच्या इमारतीची देखील पडझड झाली आहे तर संपूर्ण परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिकांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी या शाळा पाडून विश्रामगृह उभारण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवल्याने महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी यासंदर्भात सध्या विश्रामगृह उभारण्याचा निर्णय स्थगित केला असून यावर पुन्हा फेरविचार करणार असल्याचे सांगितले.
राज्यभरात मराठी शाळा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रयत्न केले जात आहे मात्र ज्या ठिकाणी मराठी शाळा वाचवल्या पाहिजे त्या ठिकाणी प्रशासनाकडूनच या शाळा बंद करण्याचा घाट घातला जातो. आगामी सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने नाशिक मध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जात आहे मात्र एका बाजूला मराठी शाळा बंद करून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारत गोरगरिबांच्या मुलांचं भविष्यात धोक्यात घालत कुंभ करण्याचा हा निर्णय नाशिककरांच्या पचनी पडत नाही. मात्र हा संपूर्ण विरोध असताना आता पालिका प्रशासन आणि सरकार नाशिक मधली पहिली मराठी माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी काय निर्णय घेणार हे बघ ना महत्त्वाचा असणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI