Nashik Leopard Attack: पुणे (Pune) पाठोपाठ नाशिक (Nashik) तालुक्यातील लोहशिंगवे (Lohshingve) गावात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attak) 35 वर्षीय सुदाम जुंदरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना गावाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत सुदाम जुंदरे यांचा मृतदेह आढळला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी करत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोहशिंगवे परिसरात बिबट्याचा सतत वाढता संचार पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याआधीही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, देवळाली परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे तिघांचा बळी गेला होता. सतत वाढत असलेल्या या घटनांमुळे वन विभागावर नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे.
Nashik Leopard Attack: छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
त्यातच नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावात बिबट्याने तरुणावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्लात सुदाम जुंदरे या तरुणाचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. तत्काळ हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याआधीही आजूबाजूच्या गावात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी वन विभागाला धारेवर धरले. यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Pune Leopard Attack: अखेर पुण्यातील नरभक्षक बिबट्या ठार
Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला, त्यानंतर बिबट्याने वनकर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला केला. अखेर दोन शार्प शूटरांनी तीन फायर करत बिबट्याला ठार केलं. सुमारे 6 वर्ष वयाचा नर बिबट्या असून, त्याने गेल्या काही दिवसांत तीघांचा पाच वर्षीय शिवन्या बोंबे, 70 वर्षीय भागुबाई जाधव आणि 13 वर्षीय रोहन बोंबे यांचा बळी घेतला होता. या घटनांनंतर परिसरात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतप्त नागरिकांनी आंदोलन आणि महामार्ग रोखून धरला होता. वनसंरक्षक आशीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम, शार्प शूटर आणि ड्रोनच्या साहाय्याने ही मोहीम पार पडली. बिबट्याला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह माणिकडोह बिबट निवारा केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा