नाशिक : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक (Nashik ganesh Visarjan) सुरु असताना अचानक दोन तरुणांची (Fight) हाणामारी झाली. त्यामुळे ऐन मिरवणूक सुरु असताना झालेल्या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून दोघांनाही पोलिसांनी (Nashik police) रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, काही वेळासाठी झालेल्या गोंधळामुळे बघ्यांनी मिरवणूक सोडून हाणामारी पाहण्यासाठी गर्दी केल्याचेही दिसून आले.
नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असून सकाळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरवात झाली. दरम्यान सकाळपासुन नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावर पाय ठेवायला जागा नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मिरवणूक भद्रकाली परिसरात असताना अचानक दोन तरुणांची (Youth Fight) हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळपासुन गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) मोठा उत्साह नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. सकाळी शहरातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जन मिरवणुकाला (Ganesh Visarjan) सुरवात झाली. भद्रकाली परिसरात मिरवणूक आली असताना दोन तरुणांची हाणामारी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. मात्र या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रकताच्या थारोळ्यात खाली पडला होता. पोलिसांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. नेमकी हाणामारी कशामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही, तसेच दोघांची ओळखही पटू शकली नाही. मात्र ऐन मिरवणुकीत झालेल्या राड्यामुळे बघ्यांचा ताफा थेट मिरवणुकीतून हाणामारीकडे गेल्याचे पाहायला मिळाले. सध्या मिरवणूक सुरळीत सुरु असून भद्रकाळीपासून पुढे हळूहळू सरकत आहे.
मिरवणुकीत पालकमंत्र्याचा हटके डान्स
नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट मिरवणूकीत सहभागी होवून स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. याचवेळी आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी देखील ढोल हातात घेत वादन केले. त्याचबरोबर दादा भुसे यांनी मालेगावच्या प्रसिद्ध तीन पावलीवर भन्नाट डान्सही केला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष निनादात होता. आता भद्रकाली परिसरात असलेली गणेश मिरवणूक पुढे सरकून दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट अशी पुढे जाणार आहे.
इतर महत्वाची बातमी :