नाशिक : ''संजय राऊत (Sanjay Raut) एक तर तुम्ही मनोरुग्न झालेला आहात, म्हणून सकाळी उठून अशी वक्तव्य करतात आणि दुसरं तुम्हीच कदाचित ड्रग्स घेत असाल, असं आम्हाला वाटायला लागलं आहे. किंवा प्रकरणांमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं दिसतंय, त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे (devyani Farande) यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांना हप्ते जात होते का? उद्धव ठाकरेंच्या सेनेला हप्ते जात होते का?'' असाही सवाल फरांदे यांनी उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये (Nashik) ड्रग्ज प्रकरणाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena) भव्य मोर्चा आयोजित केला असून संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपही केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सहा आमदारांना हफ्ते जात होते का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ललित पाटील प्रकरणांमध्ये जे काही आरोप केलेले आहेत, त्या सगळ्या संदर्भात भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार संजय राऊत MP Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप करण्यापेक्षा एक वर्षांपूर्वी तुमचं सरकार होतं. तुम्ही कुठल्याही ड्रग्ज विकणाऱ्या माणसाला अटक करू शकला नाही. त्यामुळे ड्रग्जवाल्यांना कोण पाठीशी घालतय, की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅंग घालतेय आणि त्याहीपेक्षा संजय राऊत घालताय हे पाहावे लागणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.
देवयानी फरांदे पुढे म्हणाल्या की, ललित पाटील (Lalit Patil) हा शिवसेनेचा होता. त्यामुळे ललित पाठीतकडून संजय राऊत यांना हप्ते जात होते का? उद्धव ठाकरेंच्या सेनेला हप्ते साथ होते का? राज्याच्या गृहमंत्र्यांना भांग घेता का काय अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना प्रति प्रश्न आहे की, संजय राऊत एक तर तुम्ही मनोरुग्न झालेला आहात, म्हणून सकाळी उठून अशी वक्तव्य करतात आणि दुसरं तुम्हीच कदाचित ड्रग्स घेता आहात का? अस आम्हाला वाटायला लागल आहे. किंवा या प्रकरणांमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं दिसतंय. त्यासाठी तुम्ही असे बेताल झालेले आहात. तुमच्या अंगाचा उडालेला आहे. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करत असून या रॅकेटमध्ये अडकलेला प्रत्येक माणसाला जेरबंद करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
गृहमंत्री जर हातबल असते तर...
नाशिकमधील ड्रग्ज रॅकेटसंदर्भात (Nashik Drug Racket) आम्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केला होता. यावर विरोधी पक्षाच्या एकही माणसाने या ड्रग्स विषयावर कधी कोणाला निवेदन दिलेलं नव्हतं. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही बेताल वक्तव्य करायला लागलेली आहे. गृहमंत्री जर हातबल असते तर नाशिकचा कारखाना उघडकीस आला नसता, सोलापूरचा कारखाना उघडकीस आला नसता. ठाकरे सेनाच हतबल झाली आहे, जेव्हा त्यांनी काँग्रेसची हात मिळवली केली, जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. यांनी तीन वर्षांमध्ये किती ड्रग्ज कारखाने उध्वस्त केले. किती ड्रग्ज रॅकेट संदर्भातील लोकांना आतमध्ये टाकलं असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस कडक कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाची बातमी :