नाशिक : नाशिकच्या (Nashik) पांडवलेणी परिसरात असलेल्या बुद्ध स्मारकाच्या परिसरात आज श्रीलंका (Sri Lanka) तील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Govt.) आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशातील भन्ते आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 


त्रिरश्मी लेणीवर भीम अनुयायांची प्रचंड गर्दी


आज सर्वत्र विजयादशमी दसरा सण साजरा करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील दसऱ्याला विशेष महत्व आहे. नाशिक शहरातील त्रिरश्मी लेणीवर भीम अनुयायांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर दीक्षा ग्रहण केली होती. त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्रिरश्मी लेणीवर मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दाखल होत असतात. तर आज विशेष म्हणजे याच त्रिरश्मी लेणीवर श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्याच वृक्षाच्या फांदीचे नाशिकमध्ये रोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे आज मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार असून श्रीलंका, थायलंड, मलेशियासारख्या देशांतूनही महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे. 


सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त


दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था आणि इतर सोयी-सुविधांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सम्राट अशोक यांनी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे धम्मदिक्षा घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, दादा भुसे हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.


देश-विदेशांतील भिख्यू, उपासकांची उपस्थिती


या सोहळ्यासाठी संपूर्ण बुद्ध स्मारक परिसराची सजावट करण्यात आली आहे, तर बौद्धस्तुप आकर्षक रंगसंगतीने उजळून निघाला आहे. या महोत्सवासाठी श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि नेपाळ येथील प्रमुख भीख्यू आणि मान्यवरांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. जिल्ह्यातील उपासक, उपासिका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. सोमवारी दिवसभर या सर्वांच्या आगमनाची तयारी सुरू होती. बुद्ध स्मारकाच्या परिसरात फांदी रोपण होणारी जागा सजविण्यात आली असून, संपूर्ण परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. परिसर पंचशील ध्वजांनी सजविण्यात आला असून, बॅरिकेटस् टाकून मार्ग निश्चिती करण्यात आली आहे. मुख्य सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. बोधीवृक्ष फांदीरोपण बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या उपासक, उपासिकांसाठी मागणीनुसार जाणार असल्याचे महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले, तशा सूचना त्यांनी सर्व आगारप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Nashik News : विजयादशमीला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवर श्रीलंकेतील बोधिवृक्षाचे रोपण, कसा असेल संपूर्ण कार्यक्रम, वाचा एका क्लिकवर