नाशिक : बारा जोतिर्लिंगापैकी असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात यंदाच्या श्रावणात लाखो भाविकांनी दर्शन घेत अधिक आणि श्रावण (Adhik Mas) महिन्यात जवळपास पाच कोटीहून अधिक रक्कम सशुल्क दर्शनातून जमा झाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. या दोन महिन्यात सुमारे 12 लाखांहून अधिक भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. 23 जुलै रोजीच्या एकाच दिवशी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) देवस्थानला 14 लाखांचे उत्पन्न सशुल्क दर्शनातून मिळाल्याचे सांगितले. 


नाशिक (Nashik) जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला (Trimbakeshwer Jotirlinga) अनन्यसाधारण महत्व असल्याने भाविक नेहमीच त्र्यंबकेश्वरला पसंती देतात. शिवाय नारायण नागबलीसारख्या पूजा विधी शहरात होत असल्याने नेहमीच भाविकांचा राबता असतो. तसेच यंदा अधिक आणि श्रावण मास (Shravan Mas) असा दोन महिन्याचा श्रावण महिना जोडून आला. त्यामुळे देखील भाविकांचा दर्शनासाठी प्रचंड ओघ पाहायला मिळाला. त्यानुसार यंदा अधिक आणि श्रावण महिना त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून सशुल्क दर्शनबारीच्या माध्यमातून 18 जुलै ते 14 सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच कोटी तीन लाख 79 हजार 800 रुपयांची कमाई देवस्थानच्या पारड्यात जमा झाली आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दर्शन रांगेसह सशुल्क दर्शनाची सोय करण्यात येते. तसेच अनेकदा व्हीआयपी दर्शनही होत असते. या महिन्यात श्रावण महिन्याला अधिक मास जोडून आल्याने भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. यात 18 जुलै रोजी अधिक मासाला प्रारंभ झाल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी संपला. या एक महिन्याच्या कालावधीत सशुल्क दर्शनातून 2 कोटी 61 लाख 21 हजार 800 रुपये जमा झाले तर 17 ऑगस्ट रोजी श्रावण सुरुवात होऊन 14 सप्टेंबर रोजी श्रावण संपला, या एक महिन्याच्या कालावधीत 2 कोटी 42 लाख 58 हजार रुपये सशुल्क दर्शनातून जमा झाले. अशा पद्धतीने दोन महिन्याच्या कालावधीत एकूण 5 कोटी 3 लाख 80 हजारांची कमाई त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला झाली. 


12 भाविकांनी घेतलं त्र्यंबक दर्शन 


दरम्यान या दोन महिन्यांच्या कालावधीत पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले होत असायचे, पहाटेपासूनच भाविकांची तुडुंब गर्दी दर्शनासाठी असायची. यात अनेक भाविक दोनशे रुपयांच्या सशुल्क दर्शनाचा माध्यमातून त्र्यंबक राजाचे दर्शन घेत असत. या दोन महिन्यात सुमारे 25 लाखाच्या वर भाविकांनी त्र्यंबक नगरीत दाखल होत 12 लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. तर सर्वाधिक कमाई एकाच दिवशी म्हणजे 23 जुलै रोजी 14 लाख रुपयांची झाली. एकाच दिवशी जवळपास पाच हजार भाविकांनी थेट दर्शनाचा लाभ घेतला. तर पूर्ण दर्शन बारीतून सरासरी 15 हजार भाविक दर्शन घेत होते, अशी माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली. 


इतर महत्वाची बातमी : 


Shravani Somvar : आज शेवटच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरी गजबजली, हजारो भाविकांनी साधली ब्रह्मगिरी फेरीची पर्वणी!