नाशिक : नाशिकमधून (Nashik) लाचखोरीचे प्रकरण सुरूच असून अशातच एक लाचखोरी (Bribe) प्रकरणाचा न्यायालयाने निकाल लावत संबंधित लाचखोर अधिकाऱ्यास पाच वर्षे सश्रम कारावास व दहा लाख रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. मालेगाव अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून लघु पाटबंधारे विभागातील शाखाधिकाऱ्याने 15 हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी संबंधित लाचखोर (Bribe) अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


नाशिक जिल्ह्यातील बागलाण (Baglan) तालुक्यात जाखोडा धरण असून या धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु होते. या गाळ काढण्याच्या मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व केस न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. सटाणा येथील लघु पाटबंधारे उपविभागाचा शाखाधिकारी राजू पूना रामोळे यास एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नायालयीन प्रक्रियेत असल्याने पोलिसांची चौकशीसह तपास सुरु होता. पोलिसांचा तपास न्यायालयाची निरीक्षण या सर्वांच्या तपासानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. मालेगावचे (Malegaon) अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एस. यू. बघिले यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व दहा लाख रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.


दरम्यान या संदर्भात सटाणा पोलिसांत (Satana Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश बघिले यांच्या समोर झाली. खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता बागले यांनी पाहिले. सरकारी अभियोक्ता महेंद्र फुलपगारे व एस. के. सोनवणे यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी केलेला तपास व महत्त्वाच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने लोकसेवक राजू रामोळे यांना दोषी धरून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास सुनावला आहे. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता.


महावितरणचा अधिकारी जाळ्यात 


नुकतीच जळगाव (Jalgaon) शहरात महावितरण विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ असलेल्या संतोष भागवत प्रजापती यांनी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची घटना समोर आली. यातील तक्रारदार यांचे आईचे नावाने घराचे जुने विज मिटर असुन यातील संशयित यांनी विज मिटर हे जुने असून नादुस्त आहे. तुम्हाला नविन मिटर बसावावे लागेल. त्यासाठी मला 25000 हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदार यास सांगितले. त्यांनतर तक्रारदाराने तेहत एसीबीचा दरवाजा ठोठावला. एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. यावेळी संशयित प्रजापती यांनी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Bribe : नाशिकमध्ये लाचखोरी सुरूच, जीएसटी अधिकाऱ्यांसह चार लाचखोर लाचलुचपतच्या जाळ्यात; दोन दिवसांतील कारवाई