नाशिक : 2016 च्या आसपास ललित पाटीलच्या (Lalit patil) प्रवेशावेळी संजय राऊतच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) उपस्थितीत प्रवेश झाला. त्यावेळी मी राज्यमंत्री म्हणून उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. एवढं महत्त्व त्या पक्षप्रवेशाला देण्यात आलं. मग कोणत्या नेत्यांमुळे प्रवेश झाला, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असा पलटवार मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. 


गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील (Lalit Patil Drug Case) प्रकरणावरून चांगलाच वाद रंगला असून राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे. सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांचे नाव या प्रकरणात घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी तुफान जुगलबंदीही पाहायला मिळाला. या सगळ्यात दादा भुसे यांनी वारंवार आरोपांचे खंडन करत कधीही माझी चौकशी करा, असे सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेले संजय राऊत यांनी नाशिकमधील सहा आमदारांना हफ्ते मिळत होते, अशी घणाघाती टीका करत दादा भुसे यांनीच ललित पाटीलचा शिवसेनेत प्रवेश केल्याचे देखील ते म्हणाले. यावर आज दादा भुसे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यावेळी मी राज्यमंत्री होतो, तर संजय राऊत हे संपर्क प्रमुख होते, मग कुणाची चौकशी करायला हवी असं सवाल भुसे यांनी उपस्थित केला. 


संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना भुसे म्हणाले की, जे मुंबईवरून कृत्रिम हावभाव आणून नाशिककरांची बदनामी करायला आले होते. ते ललित पाटीलच्या प्रवेशावेळी संजय राऊतच 2016 च्या आसपास त्यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचे भुसे म्हणाले. तसेच त्यावेळी राज्यमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. एवढं महत्त्व त्या पक्षप्रवेशाला देण्यात आलं. मग कोणत्या नेत्यांमुळे प्रवेश झाला, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. नाशिक जिल्ह्याचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असेल, तर मंत्री म्हणून मी उपस्थित होतो. आंतरराष्ट्रीय चौकशी करा, पण म्हणणाऱ्याने माझी पण चौकशी करा, असं म्हटलं पाहिजे, असा टोलाही दादा भुसे यांनी लगावला आहे. 


दसरा मेळाव्याला सर्वाधिक शिवसैनिक नाशिक जिल्ह्यातील 


दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. दसरा मेळावा तयारीवर दादा भुसे म्हणाले की, आकडेवारीवर शिवसेना बोलत नसते. ठाण्यानंतर सर्वाधिक शिवसैनिक नाशिक जिल्ह्यातील उपस्थित असतील. मिळेल त्या वाहनाने शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी पोहोचतील. तर दसरा मेळाव्याच्या आधीच रावण दहन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे, यावर भुसे यांनी या विषयातील काही माहीत नसल्याचे सांगितलं. 


इतर महत्वाची बातमी : 


Uddhav Thackeray : 'हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं', ललित पाटील प्रकरणी उद्धव ठाकरेंचं रोखठोक प्रत्युत्तर