नाशिक : 'गौतम बुद्धांचा (Gautam Budhha) शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्या दिवशी नागपूरच्या (Nagpur) दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे (Vijayadashami) कोट्यवधी बांधवांच्या आयुष्यात सन्मानाचा सूर्योदय झाल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 


आज नाशिकच्या (Nashik) त्रिरश्मी लेणीवर बुद्ध स्मारकाच्या परिसरात आज श्रीलंकेतील (Sri Lanka) अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या (BodhiVruksh) फांदीचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा संदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते. आज विजयादशमी आहे. विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, आज अपूर्व योग असा जुळून आला आहे की, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक करावा लागेल. पाथर्डीच्या या शिवारात बुद्ध स्मारक परिसरात या महाबोधी वृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील, असेही ते म्हणाले. 


मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता, बंधुता आणि एकता या मूल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संतमहंतांची भूमी आहे. या संतांनी आम्हाला समतेचा वसा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shiwaji Maharaj) या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देवधर्म आणि देवळांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. 


सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श 


महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे. त्याच आदर्शंवर वाटचाल सुरू आहे. नाशिकच्या पवित्र परिसरात महाबोधी वृक्ष बहरणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलं, याचं समाधान आहे. आजच्या या ऐतिहासिक महाबोधि वृक्षरोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहचेल अशी खात्री आहे. श्रीलंका आणि मलेशियातून आलेल्या सर्व मान्यवरांचा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने स्वागत करतो.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : नाशिकच्या बुद्ध स्मारकात आज बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, हजारो भीम अनुयायांची उपस्थिती