Dada Bhuse नाशिक : प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण आहोत. कायद्यावर आपला देश चालतो. नियम आणि कायद्यावर आम्ही काम केलंय आम्हाला न्याय मिळेल. आपण सेवा करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे. काही लोकांना 24 तास राजकारण करायचे आहे. टीव्ही समोर यायचे आणि अविर्भाव आणायचा, असा टोला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे.
नाशिक येथे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दादा भुसे म्हणाले की, त्यांनी कुणाचे रेशन कार्ड काढून दिले का? कोणाच्या सुख दुखात ते कधी गेले नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार होते त्यावर आम्ही मार्गक्रमण केले. संख्याबळावर आम्ही मार्गक्रमण केले. निवडणूक आयोगाने आम्हाला निर्णय दिला आहे. माझ्या मनासारख झाले नाही का मिलिभिगत आहे, असे असते.
जो निर्णय येईल तो स्वीकारावा
त्यांना किती खात्री आहे. जो बोलत असेल त्याची पण नोरकोटेस्ट केली पाहिजे. मनाविरुद्ध झाले की बरोबर नाही म्हणायचे असे ते करतात. जो निर्णय होईल तो स्वीकारावा लागतो. कायद्याच्या चौकटीत जे प्रवधान असतील ते वापरले जातील, असे त्यांनी म्हटले.
नाशिक येथील काळाराम मंदिरासाठी भरघोस निधी
नाशिक येथील श्री काळाराम मंदिराच्या )_व सभोवतालच्या निवारा ओसरीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी रक्कम 1 कोटी 82 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले
बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेना प्रमुख बोलायचे, श्री रामाच्या जन्म भूमीवर मोठे मंदिर व्हावे. तिथे आज मंदिर होत आहे. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. तसेच बाळासाहेब कायम म्हणायचे, 370 कलम हटवा, मोदींच्या काळात कलम हटवला गेला, त्याचा शिवसैनिक म्हणून आम्हाला आनंद असल्याचे वक्तव्य दादा भुसे यांनी नाशिकमध्ये केले.
ट्रस्टच्या माध्यमातून निर्णय झाले असतील
उद्धव ठाकरेंना अयोध्येला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नाही. यावर दादा भुसे म्हणाले, मला वाटते की याबाबतचा निर्णय तेथील ट्रस्टच्या माध्यमातून झाले असतील, मला यावर बोलणे उचित नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
भुजबळांबाबत बोलणे टाळले
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनात भुजबळ बाजूला राहिले असे दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीकडून तयारी केली जात आहे राजकारण आणि पक्षाच्या पलीकडे हा कार्यक्रम होत असे म्हणत त्यांनी भुजबळांच्या समावेशाबद्दल बोलणे टाळले.
आणखी वाचा