नाशिक: नाशिकमधून (Nashik)  महत्त्वाची बातमी समोर येत असून सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना घडली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सुरगाणा (Nashik Earthquake)  परिसरात असून 2.6 रिश्टर स्केलची भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  सुदैवाने कुठलीही मोठी जीवित हानी झाली नाहीये. मात्र भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


गेल्या महिन्यात अशाच प्रकारे पहाटे नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेलेली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या पश्चिमेला 89 किलोमीटर अंतरावर पहाटे 4 वाजेच्या सुमारास 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. नाशिकच्या सुरू करण्यात नागरिकांनी भूकंपाच्या धक्क्याचा अनुभव घेतला आहे.


दरम्यान सुरगाणा परिसरात आता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू  सुरगाणात 2.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री उशिरा हे हादरे भूकंपाचे असल्याचा दुजोरा प्रशासनाकडून मिळाला आहे.