Nashik Crime: नाशिक (Nashik News) शहरात पुन्हा एकदा प्रकाश लोंढे (Prakash Londhe) टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या एका युवकावर प्राणघातक हल्ला करत टोळक्याने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न लोंढे टोळीकडून करण्यात आलाय. हल्लेखोरांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सातपूर पोलिसांकडून (Police) या प्रकरणी तपास सुरु आहे. 

Continues below advertisement

नाशिकमधील सातपूर परिसरात चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर लोंढेच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. डोक्यावर कोयत्याने सपासप वार करत, नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

Nashik Crime: नाशिकमध्ये लोंढे टोळीची गुंडगिरी कायम

विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मास्टरमाइंड प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे सध्या पोलिसांच्या ताब्यात असूनही त्यांच्या टोळीची गुंडगिरी सुरुच आहे.  हे पाहता, लोंढे टोळी थेट पोलिसांनाच (Nashik Police) "ओपन चॅलेंज" देत असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सातपूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलिसांना या हल्लाखोरांना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

Prakash Londhe: प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझर

दरम्यान, सातपूर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला रिपाइंचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने गुरुवारी (दि. 16) कारवाई करत हे बांधकाम उद्ध्वस्त केले. महापालिकेने धाडलेल्या नोटिसीला कुठलेही उत्तर न मिळाल्याने महापालिकेने सदर इमारत जमीनदोस्त केली. दरम्यान, या इमारतीचा लोंढे टोळीकडून खंडणी, अपहरण आदींसह गैरकृत्य करण्यासाठी वापर सुरू होता. दरम्यान, लोंढे यांनी राजकीय दबावाचा वापर करत थेट नंदिनी नदीच्या पूररेषेतच बेकायदेशीर इमारत उभी केली होती. 

शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिक पोलिसांनी घडक मोहीम हाती घेतली आहे. त्यात महापालिकेनेही उडी घेतली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, लोंढे याने 25 बाय 15 मीटरचा तळमजला, पहिला मजला आणि त्यावर होर्डिंग लावण्यासाठी केलेली इमारत साधारणपणे तीन-चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पूररेषेत बांधली व इमारतीत भाडेकरू टाकून त्यांच्याकडून भाडे वसूल केले जात होते. दरम्यान, गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईला सुरुवात केली. चार दिवसांपूर्वी लोंढेंच्या आणखी एका इमारतीत भुयार आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळे याही इमारतीचा गुन्हेगारी कारणासाठी वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय असून, गुरुवारच्या कारवाईतून गुन्हेगारांना इशारा दिला आहे. लोंढेच्या इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील अनधिकृत घरांनाही नोटीस पाठवून तेही पाडले जाणार आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime : हे नाशिक आहे भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल; नाशिकमधील 'लेडी डॉन'चा माज पोलिसांनी उतरवला!