सटाणा : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार (Nashik Crime News) करून तिची हत्या केलेच्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. ही घटना घडून काहीच दिवस उलटले असतानाच आता सटाण्यामध्ये एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर 75 वर्षांच्या नराधमाने अत्याचार (Nashik Crime News) केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या (Nashik Crime News)घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे.  सटाणा इथं एका 9 वर्षीय बालिकेवर 75 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा संतापाची (Nashik Crime News) लाट पसरली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.(Nashik Crime News)

Continues below advertisement

Nashik Crime News: चिमुकलीला पैसे, चॉकलेट असे आमिष दाखवत अन्....

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. माणूकीला काळीमा फासणारी ही घटना समजताच नागरिकांनी सटाणा पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या अल्पवयीन बालिकेला गेल्या सहा महिन्यापासून अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. या चिमुकलीला पैसे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी या संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात सटाणा पोलिस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे, पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

Bhandara Crime News: भंडाऱ्याच्या लाखांदुरात 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

नाशिकनंतर आता आणखी एक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे, भंडारा जिल्ह्यातील लाखांदुरात घराशेजारी खेळणाऱ्या 5 वर्षीय चिमुरडीवर एका 15 वर्षीय मुलांनं अत्याचार केला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं घडली आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलगी घराशेजारी खेळतं असताना आरोपीनं तिला मोबाईल दाखवतो, असं सांगून स्वतःच्या घरात नेतं हा अत्याचार केला. पीडित मुलीनं ही घटना आई - वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement