Nashik Accident : नाशिकमधून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांचं मोबाईलमध्ये लक्ष असतानाचा त्यांचा चिमुकला खेळताना कार खाली आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये इनोव्हा कारने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेल मधील प्रकार हा प्रकार घडलाय. ध्रुव अजित राजपूत (वय 5 वर्ष) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. 


अधिकची माहिती अशी की, वडिलांच्या सोबत हॉटेलच्या गार्डन मध्ये खेळून घरी जात असताना 5 वर्षीय चिमुकला इनोव्हाखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. ध्रुव अजित राजपूत (वय 5) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा सोबत हॉटेलमध्ये मुलांना खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना ध्रुवच्या वडिलांचा हात सोडून लॉबीमध्ये जाताच ईनोव्हा गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा यात मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ज्या इनोव्ह गाडीने उडवले सदर गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून पाळाल्याचा आरोप करण्यात आलाय. चिमुरड्याला चिरडलेल्या कार चालक दारू पिऊन गाडी चावलत होता, अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 



नाशिक ब्रेकिंग...


- हॉटेलच्या लॉबी मध्ये ५ वर्षाच्या चिमुकल्याला गाडीने चिरडल्याने मृत्यू
- नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेल मधील प्रकार
- ध्रुव अजित राजपूत वय ५ वर्ष अस मयत चिमुरड्याच नाव
- वडिलांच्या सोबत हॉटेल चां गार्डन मध्ये खेळून घरी जात असताना घडला प्रकार
- मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा सोबत हॉटेल मध्ये मुलांना खेळण्याठी घेऊन आले होते
- मात्र खेळून झाल्या नंतर घराकडे जात असताना ध्रुव वडलांचा हात सोडून लॉबी मध्ये जाताच ईनोव्हा गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा यात मृत्यू झाल्याचं समोर
- ज्या इनोव्ह गाडीने उडवले सदर गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटल मद्ये सोडून पाळाल्याचा आरोप
- ज्या गाडीने या चिमुरड्याला चिरडले तो दारू पिलेला होता असा अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसात केला आहे
- नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...



इतर महत्त्वाच्या बातम्या 


SeeShiv Munde : धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर करुणा शर्मांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया; वडिलांची बाजू घेतली