नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नाशिक महापालिकेत सत्ता असताना त्यांनी नाशिकमध्ये भव्य बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारक, शस्त्र संग्रहालयाची निर्मिती केली होती. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी अनेक शिवकालीन शस्त्र या संग्रहालयात ठेवण्यासाठी दिली होती. त्यानंतर दिवसातच या शस्त्र संग्रहालयाची दुरवस्था झाली होती. मात्र आता संग्रहालयावरून वाद पेटला आहे. नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घटना आहे.
नाशिक हे ऐतिहासिक, धार्मिक शहर आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्याची राज ठाकरेंची इच्छा होती. महापालिकेत मनसेची सत्ता असल्यामुळे त्यांनी तात्काळ हे शस्त्र संग्रहालय उभारण्याचा विचार केला होता. नाशिकमधून मनसेची सत्ता गेल्यानंतर या शस्त्र संग्रहालयाची दुरवस्था झाल्याचे दिसून आले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेनेने याच संग्रहालयाचे नव्याने उद्घाटन केले. यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तर या ठिकाणी राज ठाकरे यांचं नाव असलेली कोनशिला काढण्यात आल्याचा आरोप देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातून युवकांना ऊर्जा मिळेल : एकनाथ शिंदे
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शहराला मुलभूत सोयीसुविधा असायला पाहिजे. मात्र त्याचवेळी सामान्यांच्या विरंगुळ्यासाठी सुसज्ज असे उद्यानही हवे. उद्यानात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळेल, युवकांना ऊर्जा मिळेल असे हे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान असून, यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे. उद्यानातील साहसी खेळ, कलादालन, सॉफ्टस्कील प्रशिक्षण, वाचनालय, इ-वाचनालय हे नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरणारे असून, जागतिक दर्जाचे हे उद्यान असणार आहे. शहराचा विकास म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, इमारती असा होत नाही तर सर्वसामावेश विकास करीत असताना सर्वसामान्यांना विरुंगुळा वाटावा, उद्यान म्हणजे ऑक्सिजन सेंटर असावे, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा