नांदगाव ( नाशिक ) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) संघर्ष करणारे मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर (manoj jarange nashik visit) आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नांदगावात थांबलेल्या व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दादासाहेब पुंडलिक काळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होण्याआधीची ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी दवाखान्यात जावून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली, त्यांना धीर दिला.


मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) संघर्ष करणारे मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर असताना नांदगाव येथे त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या एका मराठा समाजाच्या व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दादासाहेब पुंडलिक काळे असे त्यांचे नाव आहे. मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होणार असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तय्यारी करण्यात आलेली होती. यावेळी डिजेच्या तालावर या दादासाहेब काळे यांनी नृत्य देखील केले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कोसळले त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, नांदगाव दौऱ्यावर आलेले मनोज जरांगे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जावून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेत चौकशी केली.


पहाटे तीन वाजता मनोज जरांगेंचं नांदगावात आगमन


मनोज जरांगे यांचे पहाटे तीन वाजता नांदगावात आगमन झाले. तब्बल 20 जेसीबीतून फुले उधळत व क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालत त्यांचं स्वागत केले. हजारोंचा जनसमुदायांनी यावेळी 'जरांगे पाटील आगे बढो' अशी घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करत मनोज जरांगे यांनी जनसमुदायाला संबोधन केले. 


मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे पहाटे 3 वाजता नाशिकच्या नांदगावात दाखल झाले.यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे तब्बल २० जेसीबीतून पुष्पवृष्टी करत तसेच क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालत स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढोची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आ.सुहास कांदे यांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांचे व्यासपीठावर स्वगात केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.गुरुवारी दुपारी एक वाजेला जरांगे पाटील हे नांदगाव येथे पोहोचणार होते मात्र तब्बल १४ तास उशिराने ते नांदगावात दाखल झाले..मात्र सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते स्वागतासाठी तोपर्यंत रस्त्यावर ठाण मांडून बसलेले होते.