Solapur Barshi Nashik Igatpuri Fire LIVE: बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात तर इगतपुरीमधील कंपनीला भीषण आग, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स
Nashik Fire: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) कंपनीला भीषण (Nashik Fire) आग लागली आहे. तर सोलापुरातील बार्शीत देखील मोठी आग लागली आहे. पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स
Solapur barshi Fire: बार्शीतल्या शिराळा-पांगरी येथे झालेल्या फटाके फॅक्टरी स्फोटात आणखी एकाचा मृत्यू
मृतांचा आकडा पोहोचला चार वर, प्रांताधिकारी हेमंत निकम यांची माहिती,
आग पूर्णपणे आटोक्यात आली असून मलब्याखाली कोणी आहे का याचा शोध सुरू,
फटाका कारखान्याला जिल्हा स्तरावरून परवानगी दिली जाते, या कारखान्याच्या परवानगी संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरु,
सध्या तातडीने शोध कार्य आणि मदत कार्य करणे गरजेचे आहे आणि ते करत आहोत,
या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यास संदर्भात पोलीस प्रशासन तपास घेऊन कार्यवाही करतील ,
कारखान्याचे मालक युसुफ मनियार यांचा दुपारपासून शोध सुरू आहे मात्र ते अद्याप सापडलेले नाहीत,
आणखी दोन ते तीन तास शोधकार्य सुरूच राहणार आहे
आज रविवार असल्याने जास्तीचे लोक कामाला आलेले नव्हते अशी माहिती आहे
बार्शी तालुक्यातील शिराळा-पांगरी गावाजवळ असलेल्या फटाक्याच्या फॅक्टरीत आज दुपारीत स्फ़ोट झाला. सध्या ही आग आटोक्यात आली असून मलब्याखाली कोणी अडकलंय का याचा शोध प्रशासनतर्फे घेतला जात आहे.
इगतपुरीच्या दुर्घटनेमुळे वसुली वादातील कृषी प्रदर्शनातील मुख्यमंत्र्यांची सभा रद्द.आयोजनातील ‘वसुली’ वादात सापडलेल्या सिल्लोड येथील कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रदर्शनावर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दुघर्टनेची छाया पसरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली. शेतकरी आत्महत्या कमी करणे हे शासनाचे उद्दिष्ट असून शेतीमधील चांगले प्रयोग प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी पाहिले तर त्याचा कमी श्रमात उत्पादन अधिक होण्यास त्याचा लाभ हाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या प्रदर्शनातील काही दालनाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इगतपुरीकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हे प्रदर्शन वादात सापडावे असे प्रयत्न काही जणांनी जाणीवपूर्वक केल्याचा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र गैरहजेरी होती. ‘ते नाराज नाहीत, ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही प्रदर्शनाला भेट देण्यास येणार असल्याचा दावा मंत्री सत्तार यांनी केला.
Nashik Igatpuri Fire LIVE: जिंदाल कंपनी अपघातातील दोन जखमींचा मृत्यू, नाशिक icu ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये चार रुग्ण दाखल त्यातील दोघांचा मृत्यू, मृत्यू झालेल्या दोन्ही महिला कर्मचारी, महिमा वय 20, अंजली वय 27 या दोघींचा झाला मृत्यू, इतर दोघांवर उपचार सुरू, दोघांच्या ही प्रकृतीत सुधारणा होत आहे.
Nashik Igatpuri Fire LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुयश हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेण्याची शक्यता, पोलीस बंदोबस्त वाढवला
Nashik Igatpuri Fire LIVE: इगतपुरी जिंदाल कंपनी आग प्रकरण आतापर्यंत 14 जण जखमी तर 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर
- नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांची माहिती
- 10.30 ते 11 दरम्यान लागली आग
- 8 बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित
- जिथे घटना घडली तिथे 10 ते 15 कर्मचारी काम करत होते
- अजून तीन ते चार जण कंपनीत अडकले
- अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू
- केमिकल कंपनी असल्याने आग विझवण्यात होत आहे विलंब
- जखमींना नाशिक मधील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले आहे दाखल
नशिक जिल्ह्याच्या इगतपुरीतील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीच्या प्लांटला आग लागल्याची घटना भीषण आहे. प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांची सुखरुप सुटका व्हावी. जखमी कामगारांना त्वरित, चांगले उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन, पोलिस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यश मिळो, अशी प्रार्थना करतो.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा.
पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि स्थानिक ईगतपुरी आमदार हिरामण खोसकर दाखल
पालकमंत्री दादा भुसे मुंढेगावच्या JPFL कंपनीत दाखल, सोबत नाशिकचे सर्व प्रशासनाचे अधिकारी
पार्श्वभूमी
Nashik Fire: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) कंपनीला भीषण (Nashik Fire) आग लागली आहे. ही आग प्रचंड असून परिसरात धुराचे लोट उसळले आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स (Jindal Polyfilms) या कंपनीला आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट ऐकू आले. कंपनीत असलेल्या रसायनांचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहींच्या मते हा स्फोट बॉयलरचा झाला असल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आग भीषण असून प्रचंड धुराचे लोट उसळले आहे. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार काम करतात. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील केमिकल स्टोरेजला आग लागली आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. 11 जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आला नाही. सध्या अग्निशमन दलाचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्फोटानंतर कंपनीचे पत्रे उडाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. स्फोटामुळे जवळपासच्या गावांना हादरे बसले असल्याचे काहींनी म्हटले. सकाळी लागलेल्या आगीनंतर दुपारीदेखील स्फोटाचे आवाज ऐकू येत होते.
पाहा व्हिडिओ: Nashik Fire नाशिकमध्ये इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग : ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -