Suhas Kande : सुहास कांदे (Suhas Kande) आणि भुजबळ (chhagan Bhujbal) वाद राज्यात सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे. गेल्या काही महिन्यापासून म्हणजेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असल्यापासून हा वाद सुरु आहे. त्यावेळी थेट हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यापर्यंतही पोहचला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद काही अंशी मिटवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशना दरम्यान हा वाद उफाळून आला आहे. यावेळी सुहास कांदे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत जाब विचारात या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याचा तगादा लावला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही. 


यावेळी सुहास कांदे यांनी सुरवातीलाच 2015 च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळयाचा (Maharashtra Sadan Scam) लेखाजोखा मांडत लक्षवेधी मांडली. यावेळी ते म्हणाले कि अंजली दमानिया (Anjali Damaniya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी अंधेरी आरटिओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. या संदर्भात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. जवळपास हा घोटाळा 1160 कोटी रुपयांचा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले आणि त्यात तत्कालीन मंत्री असलेले नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदयाचे मतदार संघात जोरदार स्वागतही करण्यात आले. जस काही ते पाकिस्तानच्या बोर्डावर लढून आले. 


ते पुढे म्हणाले नंतर विधी विभागाने एक शासन निर्णय काढला की उच्च न्यायालयात अपील करायचे. मात्र त्याच विधी विभागाने पुन्हा पत्र काढून अपील करण्याची गरज नसल्याचे सांगितले. अस काय झाल की विधी विभागाला आपला निर्णय बदलावा लागला, असा सवाल देखील यावेळी कांदे यांनी उपस्थित केला. विधी व न्याय विभागाने कोणाच्या दबावाखाली हे पत्र काढल? याची चौकशी होणार का? का ते ते माजी मंत्री बाहूबली आहेत, त्यांनी ब्लॅकमेल केल का? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित करत या संदर्भात आपण पुन्हा अपील करणार करणार असल्याचे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान सुहास कांदे यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, हे दोन जीआर रद्द करण्याचा निर्णय अधिकारी यांनी घेतला नाही. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात केला आहे. त्यामुळे याची पुन्हा तपासणी करता येते का हे पाहिलं जाईल तसेच पुन्हा अपील करता येईल का या संदर्भात चौकशी केली जाईल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुहास कांदे यांना दिले. मात्र या उत्तरावर सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही.


फडणवीस यांच्या उत्तरावर कांदे आक्रमक


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर आक्रमक होत सुहास कांदे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस तुम्ही जे उत्तर दिलं आहे, त्यावर समाधानी नसून उद्धव ठाकरे यांनी असे निर्णय घेतल्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आलो आहे. तसेच आम्ही तुमच्याकडे बघून आलो आहे. त्यामुळे गोलमोल उत्तर देणार देऊ नका. आणि जर समजा तुम्ही आधीच्या निर्णयाला स्थगिती देत असाल तर हे परिपत्रक काढले ते मागे घ्या, भ्रष्टाचार आपल्याला काढायचं असेल तर हा निर्णय रद्द केला पाहिजे, पंतप्रधान यांनी भ्रष्टाचार मुक्त घोषणा केली आहे, मग त्यांना पाठीशी का घातल जातंय? तुमच्याकडे बघून आम्ही तुमच्या सोबत आलो आहे, तेव्हाच्या सरकारमध्ये चांगली काम झाली नाही म्हणून आम्ही इथे आलो, असे सणसणीत उत्तर यावेळी सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.