Nashik Ganeshotsav : गेल्या नऊ दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात विराजमान झालेले बाप्पा उद्या भावपूर्ण निरोप घेणार आहेत. याच अनंत चतुर्दशीच्या (Ganesh Chaturthi) मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांकडून (Ganesh) वाजत गाजत निरोप दिला जाणार आहे त्यातील महत्त्वाच्या मार्गात बदल (Traffic Police) करण्यात आले आहेत त्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गावर सकाळपासून नो एंट्री असणार आहे


नाशिक शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरू असून यंदा प्रचंड उत्साह दिसत आहे. दरम्यान उद्या बाप्पाला नाशिककर भावपूर्ण निरोप देणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनांकडून जोरदार तयारी सुरू असून संपूर्ण मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गणेश मंडळाची वाहने वगळता अन्य वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेने माहिती दिली आहे.


गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion) मार्गासह नाशिकरोड, गंगापूर (Gangapur), सातपुर, सिडको या भागातील विसर्जन स्थळांजवळील वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यात आले आहेत. यासह नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंगच्या (Citylink Buses) बसेसचाही मार्ग बदलविण्यात आला आहे. दरम्यान यंदा प्रथमच मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच मिरवणूक मार्गासह उपनगरीय भागातील मार्ग वाहतुकी करता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बंदोबस्तांची आखणी करण्यात आली असून मिरवणूक मार्ग लगत कोठेही कोणीही हातगाडी, सायकल मोटरसायकल किंवा कुठलेही वाहने उभे करणार नाही. या मार्गावर केवळ मिरवणुकीत सहभागी मंडळांच्याच वाहनांना प्रवेश असणार आहे. 


बस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग 
दरम्यान विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याने शहर बस सेवा मार्गातही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पंचवटी, कारंजा, पंचवटी डेपो आणि सिटी लिंक तपोवन येथून सुटणाऱ्या सर्व बसेस या पंचवटी आगार 2 मधूनच सुटणार. तसेच ग्रामीण भागातील ओझर, दिंडोरी, पेठ येथुन शहरात ये जा करणाऱ्या सर्व बसेस व अन्य प्रकारची वाहने आडगाव नाक्यावरून कन्नमवार पुलावरून पुढे द्वारका चौकातून नाशिकरोडसह शहरात व पंचवटी कडे रवाना होतील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस शालिमार येथून सुटणार व त्याच मार्गे पुढे ये जा करतील. नांदूर नाका ते सैलानी बाबा चौक या मार्गे नाशिक रोड करेल जाणारी वाहने नांदूर नाक्यावरून औरंगाबाद रस्त्यावरून तपोवन आतील स्वामी जनार्दन पुलावरून पुढे रवाना होतील नदीपात्र याकडील दोन्ही बाजूच्या वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद असेल. 


अशी असेल मिरवणूक 
नाशिक शहरातील गणेशोत्सवाची मुख्य मिरवणूक चौक मंडई म्हणजेच वाकडी बारव, जहांगीर मशीद, फाळके रोड, महात्मा फुले मंडई, दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक,  भद्रकाली बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉईंट, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा मार्गे होळकर पुलावरून मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजारातून म्हसोबा पटांगणावर मिरवणूक पोहोचणार आहे.