Abdul Sattar Nashik : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांचीतब्येत बारी नसल्याने रश्मी ठाकरेंना (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगितले होते. मात्र नंतर वेळीच आम्ही निर्णय घेतला. पण उध्दव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या सोबत राहिलो असतो तर माझ्या नावापुढे माजी आमदार पाटी लागली असती, ते चालले नसते, मला पुन्हा निवडून यायचे आहे, असा सणसणीत टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.
नाशिकमध्ये (Nashik) जिल्हा कृषी महोत्सवाचे (Krushi Festival) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार हे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 'एक दिवस बळीराजा सोबत' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यासाठी आता एक समिती नेमणार आहोत. या समितीवरील अधिकारी अहवाल सादर केला. प्रत्येक विभागाचा प्रश्न वेगळा असून त्यानुसार काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यभरात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव पडतात, यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.किती पीक लागते, किती उत्पादन घ्यायला पाहिजे याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. यावर उपाय म्हणून शेतीमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार केले जात आहेत.
कर्नाटक वादावर (Maharashtra Karnataka Dispute) विरोधकांनी एकत्र येऊन लढावं असं मत अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले कि, सीमावादा बाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही. दोन्ही बाजूला भाजप सरकार आहे त्यामुळे अमित शहा तोडगा करतील. भविष्यात असे वाद होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे. महाराष्ट्र मधील सर्व पक्ष एक आहेत. विरोधकांनी एकजूट होऊन महाराष्ट्र साठी लढावे. केंद्र सरकार आपल्याला न्याय देईल. महाराष्ट्रच्या हिताचे जे बोलतील त्या सोबत आम्ही आहोत. मग अजितदादा असो की कोणीही असो आम्ही सोबत असल्याचे कर्नाटक वादावर ते म्हणाले.
शरद पवार, संजय राऊत, अंधारे, मंत्री मंडळ विस्तारावर म्हणाले...
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी 48 तासांची मुदत दिली. ते महाराष्ट्रच्या बाजूनं बोलले, आम्ही त्यांच्या विधान विरोधात नाही. दुसरीकडे संजय राऊत काही काळ आत राहून आलेत, त्यामुळे त्यांना कुलूप आठवतात. तिकडे सुषमा अंधारे पेटून उठल्या आहेत. अंधारे बहीण नक्कल करते. त्या विषयी काय बोलणार, उलट त्या बोलल्याने आमची मत अधिक वाढतात, त्यांनी बोलावं, नक्कल करायला अक्कल लागते, असा टोलाही शेवटी त्यांनी अंधारेना लगावला. तसेच निवडणुकीला सरकार घाबरत नाही, ग्रामपंचायत सहकार अशा निवडणूक होत आहेत. गुजरात ची निवडणूक होती, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते प्रक्रियामध्ये होते, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे मिळुन विस्तार करतील, त्यामुळे लवकरच विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे फिरत आहेत, पण...
सध्या उद्धव ठाकरे राज्यातील अनेक भागातील दौरे करत आहेत. 'परदे मे रहने वाले' आता बाहेर पडत आहेत. चांगली गोष्ट असून प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे, कारण यातून पक्षवाढीस मदत होते. त्यामुळे आता सर्वच बाहेर फिरत आहेत. राहुल गांधी भारत जोडोच्या माध्यमातून फिरत आहेत, त्यामुळे त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये फायदा झाला. राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना सत्तार यांनी कोपरखीळी दिली.