Nashik News : 'भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नही' या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यातील एका पोलिसाला आला आहे. 24 वर्षांपूर्वी हातून न घडलेल्या गुन्ह्यात संशयित म्हणून असणाऱ्या पोलिसाला अखेर न्याय मिळाला आहे. २४ वर्षापुर्वी साडे तीनशे रुपयांची लाच घेतल्या प्रकरणातील संशयित म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र या प्रकरणातून निर्दोष सुटलेे असुन त्यांना गेल्या 24 वर्षाची भरपाई सव्याज मिळणार आहे. 
 
हि गोष्ट आहे, 1988 सालची. येवला येथे दामू आव्हाड हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. यावेळी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1988 मध्ये आव्हाड यांच्याविरुद्ध 350 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. भ्रष्टाचार प्रकरणी 24 वर्षांपूर्वी दोषी ठरलेल्या आणि एका वर्षाची शिक्षा झालेल्या पोलिस कर्मचार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आव्हाड यांनीे 350 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी अपयशी ठरल्यानेे न्यायालयाने त्यांना निदोष र्सोडले आहे.


कनिष्ठ न्यायालयात दोषी, उच्च न्यायालयात निर्दोष
ऑगस्ट 1998 मध्ये नाशिकच्या विशेष न्यायालयाने दामू आव्हाड यांना दोषी ठरवून एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आव्हाड यांनी  उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती व्हीजी वशिष्ठ यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी केवळ पैशांच्या वसुलीच्या आधारे दोषी ठरवता येत नाही असे म्हटले. त्यानंतर फिर्यादी पक्ष आव्हाडांंविरुद्धचा खटला सिद्ध करण्यातही साफ अपयशी ठरला.


नेमकं प्रकरण काय? 
येवला तालुका पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या तत्कालीन उपनिरीक्षक आव्हाड यांंनी लाच न मागता उलट एका व्यक्तीला जामीनासाठी आर्थिक मदत देऊ केली हेाती. मात्र गैरसमजातुन 350 रुपयांची लाच मागितली असा आरोप झाला. आणि 24 वर्ष त्यांना त्रास सहन करावा लागला. आता मात्र आरोप सिद्ध न झाल्याने त्यांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. येत्या पंधरा दिवसात गृह खात्याला त्यांचा उरला सुरला सर्व हिशोब पुर्ण करुन द्यावा लागणार आहे. जेवढा त्रास सहन केला त्यांच्या दुप्पट आता आनंद झाला असल्याचे सांगितले. 


महत्वाच्या बातम्या: