Nashik Bribe : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाच घेणाऱ्या कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नाशिक शहर (Nashik City Police) पोलिसांच्या दलातही लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी एक लाचेचे (Bribe) प्रकरणे समोर आले आहे. 30 हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आला आहे. 


नाशिक ग्रामीण हद्दीतील जायखेडा पोलीस ठाणे (Jaykheda Police Station) हा हद्दीत हि घटना घडली आहे. दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरता 30 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपाई असलाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचून अटक करण्यात आले आहे. जायखेडा पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या प्रकरणात त्यांना अटक न करण्याकरता पोलीस शिपाई सचिन राजेंद्र पवार यांनी 30 हजारांची मागणी केली. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधला. दरम्यान यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळसेकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे, यांच्या पथकाने पवार या सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील लाचेची प्रकरणे 
जानेवारी 2021 मध्ये मालेगाव (Malegaon) शहरातील आयशानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयिताला मदत करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाकडून पाच हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस शिपाई काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये ओझर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नियुक्त असलेेले संशयित कारभारी भिला यादव यांना तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 


मे महिन्यात कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाण्यात वाद मिटविल्याचा मोबदला व कोर्टात केस न पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना येथील पोलिस ठाण्यातील हवालदार रमण तुळशीराम गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले. मे महिन्यात नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. तर नाशिक शहराजवळील आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले होते. 


संपर्क साधण्याचे आवाहन 
एकीकडे गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. गेल्या वर्षभरात लाच लुचपत विभागाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.