Nashik Padvidhar Election : सकाळच्या सुमारास संजय राऊत (sanjay raut) यांनी संकेत दिल्यानंतर अखेर मातोश्रीवरील बैठकीनंतर नाशिक पदवीधारच्या (Nashik Padvidhar) अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत अद्यापही ट्विस्ट कायम असून अजून काय काय बदल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत राजकीय गणित बिघडत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते आतापर्यंत अनेक मोठं मोठ्या घडामोडी घडत असून आज सकाळी संजय राऊत यांनी नाशिक पदवीधर निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा यासाठी मातोश्रीवर बैठक घेत आहोत. त्याच सुमारास मूळच्या धुळे येथील असलेल्या शुभांगी पाटील या देखील मातोश्रीवर उपस्थित झाल्या.दरम्यान बैठक झाल्यानंतर अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती नाशिक शिवसेनेचे सुनील बागुल यांनी यावेळी दिली. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज एक ना एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 


शुभांगी पाटील या धुळ्याच्या असून त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. भाजपकडून एबी फॉर्म मिळणार असल्याची शक्यता असताना तसे झाले नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्याच दिवशी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी घडामोड घडली. आणि काँग्रेसने यावर पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा करणार आहे, मात्र तत्पूर्वी ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असल्याने या निवडणुकीत आणखी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 


नाशिकमधील पदवीधर निवडणुकीसंदर्भात घडणाऱ्या घडामोडींचा आणखी वेग आला असून अपक्ष उमेदवार शुभांगी उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, अस संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी काहीतरी मोठा गेम करणार हे निश्चित होत, त्यानुसार मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक झाली या बैठकीस शुभांगी पाटील देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. बैठकीनंतर लागलीच ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


महाविकास आघाडीचा ट्विस्ट 
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून आता या ट्विस्टमध्ये महाविकास आघाडीने नवे ट्विस्ट उभे केले आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज महाविकास आघाडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरविण्यात येणार आहे. शिवाय सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचे काय या प्रश्नाची उकल देखील बैठकीत होणार असल्याचे समजते. मात्र महत्वाचे असे कि, महाविकास आघाडी नागपूर आणि नाशिकच्या जागांमध्ये अदलाबदल करणार असून नागपूरचे जागेवर काँग्रेस लढणार आहेत. तर नाशिकच्या जागेवरती काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी किंवा शिवसेना लढणार असल्याचे समजते आहे.