Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींवर अत्याचार (Molestation) केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत (Police Custody) असलेला संशयित हर्षल मोरे यास मंगळवारी जिल्हा न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यास नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ताबा घेतल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करणार असल्याचे समजते. 


नाशिक शहरातील म्हसरूळ येथील आश्रमातील मुलींवर अत्याचार प्रकरणी हर्षल मोरे (Harshal More) विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. तो गेल्या दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले हाते. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यानुसार संशयित हर्षल मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालय याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात (Mhasrul Police) असलेल्या द किंग फाउंडेशन संस्थेच्या नावाने चालवले जाणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सहा मुलींचे लैंगिक शोषण तेथील संचालक संशयित हर्षल मोरे यांनी केल्याचे गेल्या आठवड्यात उघडकीस आले. या प्रकरणांने नाशिक जिल्ह्यासह राज्य सरकार देखील हादरून गेले आहे. महिला व बाल विकासमंत्र्यांसह महिला व बालविकास आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मागील गुरुवारी त्यास न्यायालयाने अत्याचार, पॉक्सो, व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलीस  वाढवण्यात आली. तर आजच्या न्यायलयीन सुनावणीत त्यास चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 


चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी 
दरम्यान सात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत होता. त्यावेळी पोलिसांकडून तपास सुरु असताना हर्षल मोरे यास म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात नेण्यात आले. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. शिवाय ही चौकशी इन कॅमेरा करण्यात आली आहे. त्यानंतर आता हर्षल मोरेंचा ताबा न्यायालयाने घेतल्यानंतर सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रकरण गंभीर असल्याने चौकशीसाठी समितीची करण्यात येऊन अहवाल सादर करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिले होते. तो अहवाल देखील महत्वाचा ठरणार आहे.