Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बागलाण (Baglan) तालुक्यातील नामपुर येथे पैशांच्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली असून जायखेडा पोलिसांनी (Jaykheda Police) या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरांसह जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. 


वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककर सध्या भयभीत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यांतही गुन्हेगारी वाढत चालली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत शहरांत प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत असून नवरात्रीतील दांडियात तर अनेक हल्ल्याच्या घटना समोर आल्या. यात एकाचा मृत्यू देखील झाला. तर दुसरीकडे बागलाण तालुक्यात कांदा व्यापाऱ्याच्या कांदा खळ्यात काम करणाऱ्या मजुराचा दोन हजार रुपयांसाठी खून केल्याची घटना समोर आली आहे. 


बागलाण तालुक्यातील नामपुर कृषि उत्पन्न बाजारसमितीतील कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या कांद्याच्या खळ्यावर कामाला असलेल्या तीन मजुरांमध्ये पैशांवरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होवून बिकासकुमार आणि अनिल कुमार या दोन तरुणांनी मुकादम शिवानंद कामत याचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 


दोन हजारांवरून वाद 
प्राथमिक माहितीनुसार मुकादम शिवानंद कामत आणि संशयितामध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याघेण्यावरून वाद झाला. आणि या वादातच दोघांनी मुकादम शिवानंद याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नामपुर येथील कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या सटाणा रोडवरील बालाजी ट्रेडिंग या कांद्याच्या खळ्यावर परप्रांतीय मजूर काम करतात बुधवारी मध्यरात्री कांद्याच्या खड्यात दिवाल कमल ऋषी देव व अनिल कुमार रामकुमार यांचे पैशावरून शिवानंद लखन काम त्यांच्याशी वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने दोघं मजुरांनी शिवानंद याचा खून केला असल्याची तक्रार सचिन मुथा यांनी दिली. जायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी विवाह अनिल कुमार यांना दोघांना अटक केली.