Nashik Satyajeet Tambe : "महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बनून या विधान परिषदेमध्ये (Vidhan Parishad) सभागृहात काम करायचा आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय योगदान देता येईल, ते योगदान देण्याचा प्रयत्न मला करायचा आहे," अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिली आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) सत्यजीत तांबे दाखल झाले होते. 


नाशिक पदवीधर (Nashik) निवडणूक सगळ्यांना माहिती असेल की कशी झाली होती. आतापर्यंतच्या चर्चेतला विषय होता. यानंतर आज आमदार सत्यजीत तांबे हे विधिमंडळात दाखल झालेले पाहायला मिळाले. सत्यजीत तांबे पहिल्यांदाच अधिवेशनासाठी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले कि संमिश्र भावना आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी जशी उत्सुकता होती, मनाची घालमेल होती. शाळेतला पहिला दिवस असा असतो, त्या पद्धतीची भावना आहे. अशा पद्धतीच्या भूमिकेतून येतो आहे, तर निश्चितच जबाबदारी पण आहे. महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बनून या विधानपरिषदेमध्ये सभागृहात काम करायचं आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय योगदान देता येईल, ते योगदान देण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. 


नाशिक पदवीधर मधून सत्यजित तांबे हे आमदार झाले. त्यांनतर त्यांनी पहिल्यांदा विधिमंडळात प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे सद्यस्थितीत सत्ताधारी असतील, विरोधक असतील या सगळ्यामध्ये मधली भूमिका सत्यजीत तांबे यांची असणार आहे. अशा वेळेला दोघांकडेही तांबे यांचे संबंध खूप चांगले आहेत. कौटुंबिक संबंध आहेत, मात्र विधिमंडळात तुम्ही दाखल होता, त्यावेळेला आपल्याला एक तटस्थ भूमिका, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. या प्रश्नावर आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, "सरकारी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न येतील." "विधान भवनामध्ये भूमिका मी स्पष्ट करत राहिन," असंही ते म्हणाले. 


तसेच कोणते प्रश्न किंवा मुद्द्यांना विधीमंडळात उपस्थित करणार यावर तांबे म्हणाले की, "सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा जो प्रश्न आहे, तो राज्यात गाजतो आहे. संपूर्ण देशात गाजतोय, तो प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रसह महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे. याच एक प्रमुख कारण आहे की, औद्योगिकरणाच्या समतोल साधला जात नाही. ठराविकच औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगधंदे जात आहेत." या विषयावर प्रकर्षाने भूमिका मांडणार असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. 


सत्यजीत तांबेचे ट्विट 


महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) आजपासून सुरु झाले. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. याच निमित्ताने शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानभवनाची पायरी चढली. यानंतर त्यांनी आपला आनंद ट्वीटच्या (Tweet) माध्यमातून व्यक्त केला आहे. सत्यजीत तांबे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. तसेच माझे आई-वडील-मामा, माझे सर्व मित्र, माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे' अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.