Dr. Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त नाशिक (Nashik) येथील कला शिक्षक असलेल्या देव हिरे (Dev Hiray) यांनी अनोखे अभिवादन केले आहे. देव हिरे यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे. पिंपळाच्या पानावर बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा अनोखा प्रयोग असल्याचे हिरे यांनी सांगितले.
06 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस. आजच्या दिवशी देशभरातच नव्हे जगभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले व आपल्या कलेने सर्वानाच आश्चर्य चकित करणारे देव हिरे यांनी अप्रतिम पोट्रेट रांगोळी पिंपळाच्या पानावर साकारण्याचा प्रयोग केला आहे. पिंपळाच्या पानावर यापूर्वी ब्रश रेखाटन, पेंटिंग, कटिंग असे बरेच प्रयोग अनेकांनी केले. पिंपळाच्या अवघ्या 5 इंचाच्या पानावर 4 इंच बाय 3 इंच जागेत डॉ.बाबासाहेबांची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा अनोखा विक्रम नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव.चे कलाशिक्षक देव हिरे यांनी महापरिनिर्वाण दिनी केला. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना तीन तासांचा अवधी लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या शेवटच्या क्षणी मार्गदाता मानलं. आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच बुद्धाला बोधीवृक्षाखाली बसून ज्ञानप्राप्ती झाली, अशा पिंपळाच्या पानावर देव हिरे यांनी रांगोळी रेखाटून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. हिरे यांनी यापूर्वी विविध महामानवांचे फलक लेखन, पोर्ट्रेट, रांगोळी काढून समाज प्रबोधन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर व देशपातळीवर आपल्या चित्रकला, रांगोळी कला,फलक रेखाटन कलेतून देव हिरे यांची नोंद झालेली आहे. पिंपळाच्या पानावरील बाबासाहेबांची ही अनोखी पोर्ट्रेट रांगोळी बघणाऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. या अनोख्या प्रयोगासाठी कोणतेही स्केच न करता तीन तासातील चिमटीतील रांगोळी सोडण्याचे कसब व 35 ग्रॅम रांगोळी लागली. पिंपळाच्या अवघ्या 5 इंचाच्या पानावर 4 इंच बाय 3 इंच जागेत डॉ.बाबासाहेबांची पोर्ट्रेट साकारण्यात आले.
भाकरीवर बाबासाहेबांच्या रांगोळी...
देव हिरे हे आपल्या कलेतून नेहमीच चर्चेत असतात. चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा शाळेत ते कला शिक्षक म्हणून काम करतात. मात्र नेहमीच ते फलक लेखनातून, रांगोळीतून चर्चेत असतात. मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं होत. त्यानंतर आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळाच्या पानावर पोट्रेट रांगोळी साकारली आहे.