Nashik Ganeshotsav : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून नाशिक (Nashik) पोलिसांनी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी नाशिकच्या गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केल्यानंतर गणेश मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय गणेशोत्सवाची दोन वर्ष कोरोनात गेल्याने यंदाच्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नाशिकमध्ये देखील गणेशोत्सव मंडळे तयारीला लागले असून यंदा गणपती मिरवणुक बारा वाजेपर्यत डीजेच्या दणदणाटात साजरी करणार असल्याचे गणपती मंडळानी सांगितले आहे. आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गणेशोत्सव मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी नाशिकच्या गणेश मंडळांनी डीजे वाजविण्यावर आग्रही असल्याचे सांगितले. 


काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून अनेक जण शेवटच्या टप्प्यातील तयारीत आहेत. अशातच पोलिसांकडून नाशिकच्या गणेश मंडळासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गणेशोत्सवाची एक खिडकी योजना, गणेश मिरवणुकीसाठी नियम आदींचा उहापोह करण्यात आली आहे. तर डीजे लावण्यावर ठाम असल्याची भूमिका पोलीस आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंडळाधिकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावर शासनाच्या निर्णयानुसार मंडळाच्या भावनांचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. 


एक खिडकी योजना 
नाशिकच्या गणेशोत्सव मंडळासाठी शहरात एक खिडकी योजना असणार आहे. लवकरच उत्सव मंडळांना मंडप उभारणी परवानगी देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘एक खिडकी योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेत प्रभाग क्षेत्रातील मंडळांना त्या त्या प्रभाग क्षेत्र कार्यालयात सर्व परवानग्या एकच वेळी मिळणार असून यात ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिस परवानगी, वाहतूक शाखेची परवानगी, अग्निशमन विभागाची परवानगी आणि महापालिकेची परवानगी एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची पायपीट वाचणार आहे.


शासन स्तरावरूनच डीजेचा वापर करण्यास मनाई आहे त्यामुळे शासन निर्णयानुसार पारंपारिक वाद्याला परवानगी असून त्याचे पालन गणेशोत्सव मंडळांनी करावे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात असेल अशी माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी दिली