Nashik News : काही महिन्यांपासून कोळसा वाहतुकीमुळे किसान रेल्वे बंद (Kisan Railway) ठेवल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान होत असल्याचे पाहून लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांचा शेतीमाल पर राज्यात पाठवण्यासाठी देवळाली कॅम्प (Deolali Camp) ते मुजफ्फरपुर बिहार स्पेशल पार्सल (Special Parcel Service) रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. कोळसा वाहतुकीसाठी किसान ट्रेन गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले. किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आजपासून पार्सल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (Farmers) रोज लाख रुपयांचे नुकसान होत होते. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली स्पेशल पार्सल ट्रेन नाशिक रोड रेल्वे स्थानकातच येत असते ते स्वागत करण्यात आले. दर आठवड्याला मंगळवारी आणि शनिवारी ही गाडी धावणार असून स्पेशल पार्सल रेल्वे 15 डब्यांची असून तिला मिळणारा प्रसिद्ध प्रतिसाद पाहून फेऱ्यांचे दिवस वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


पार्सल ट्रेनमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे कमी खर्चात शेतीमाल पाठवून मालाला चांगली किंमत मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांप्रमाणेच ही पार्सल रेल्वे वेळेत व वेगात निर्धारित स्थळी पोहोचणार आहे. शेतकऱ्यांना दूध भाजीपाला फळभाज्यांसारख्या नाशवंत वस्तू तर उद्योजकांना औद्योगिक वस्तू नागरिकांना खाजगी पार्सल या ट्रेन द्वारे पाठवता येणार आहे. नवीन वास्तू त्यांचा वेग व सेवा चांगली असली तरी यातून माल पाठवण्यासाठी भाड्यात कोणतीही सूट किंवा सरकारच्या अनुदान नाही. त्यामुळे पार्सल ट्रेनचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


मात्र पार्सल ट्रेनची एक गैरसोय अशी होणार आहे कि, नाशिकरोडला माल रात्री येऊन पडणार असल्याने सकाळपर्यंत तो खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पार्सल ट्रेन रात्री अकरा वाजता सोडल्यास शेतकऱ्यांना देखील फायदा होईल व परराज्यातील ग्राहकांना देखील ताजा माल मिळेल. नवीन पार्सल ट्रेन  मुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नाशिकरोडला दहा ते पंधरा कॉटिंग एजंट आहेत. त्या सर्वांकडून मिळून 150 मुले कामाला आहेत. पिकप, ट्रक चालक-वाहक प्रत्येक स्थानकावरील हमाल, भाजी विक्रेते असे हजारो लोक किसान ट्रेनवर अवलंबून आहेत. मात्र सद्यस्थितीत किसान ट्रेन बंद असल्यामुळे आता 50 लोकं कामाला आहेत. महत्वाचे म्हणजे पार्सल ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला तर रोजगारही वाढणार आहे. 


किसान रेल्वे पुन्हा सुरु करावी 
मध्य रेल्वेने ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान ट्रेन सुरू केली. देवळालीहून आठवड्यातून चार किसान ट्रेन चालायच्या. त्यातून दर दिवसाला दीडशे तर नाशिक रोडून चार भोगीतून दर दिवसाला शंभर टन शेतीमाल जायचा. महाराष्ट्रात सहा किसान ट्रेन सुरू झाल्या. जानेवारी 2022 पर्यंत एकट्या मध्य रेल्वे मार्गावर 1000 फेऱ्या करून किसान ट्रेनने 260 कोटींचा महसूल मिळून दिला. कोळसा वाहतुकीसाठी किसान ट्रेन 13 एप्रिल पासून बंद करण्यात आले आहे. तीस हजार जणांचा रोजगार बुडत आहे. लाखो रुपयांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे.