Aditya Thackeray : क्रांतीची नव्हे, गद्दारीची दखल घेतली, तुम्ही गद्दारी केली. तुम्हाला तिकडे राहायचं आहे. तिथे राहा. आता हे सांगत आहेत की 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली. पण तुमच्या क्रांतीची दखल घेतली नाही. उलट तुमच्या गद्दारी आणि निर्लज्जपणाची दखल घेतली आहे, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांवर केली आहे. 


शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवस्वाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे. सध्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू असून आज ते जळगाव मध्ये आहेत. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कट रचला जातोय तुम्ही आम्हाला एकट पडू देणार का
साथ देणार का अशी भावनिक साद देखील यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांनी देण्यात आली. 


आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, 33 देशांनी तुमच्या क्रांतीची नाही गद्दारी ची नोंद घेतली. त्यामुळे निमूट आमदारकीचा राजीनामा द्या, हिम्मत आणि लाज उरली असेल तर निवडणुकीला सामोरे या. सध्याचे राजकारण मला न पटणारे असून हेच गद्दार आधी सांगत होते राजकारणमध्ये जाऊ नको राजकारण चांगले नसतं. आणि आता यांच्याच वर्तनामुळे आम्हाला एकट पाडण्याचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.


साहेब आजारी तेव्हा हे षडयंत्र रचत होते...!
दरम्यान दिवाळीच्या काळात वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आले होते. यावेळी त्या सर्वांनी जेवण केले. उध्दव साहेबांचे ऑपरेशन करायचे होते, मला जागतिक परिषदे साठी जायचे होते. उध्दव साहेब यांनी जायला सांगितले. साहेबांचे एक ऑपरेशन झाले दुसरे तत्काळ करावे लागले. यावेळी हे गद्दार साहेबांना मदत करण्या ऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे जे उध्दव साहेबांचे नाही झाले ते महाराष्ट्र आणि तुमचे काय होणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


मंत्री असतांना फिरला का नाही!
आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले गद्दार आम्हाला सांगतात की आता फिरून काय फायदा, मग तुम्ही मंत्री होतात, तुम्ही का नाही फिरला. तुम्ही गद्दार आहात गद्दारीचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरणार असा घणाघातही यावेळी त्यांनी केला. तसेच तुमच्याकडे जे खाते होते, त्यासाठी मी आदिवासी पाड्यावर फिरत होतो. लोकांची पाणी समस्या दूर केली, अशी आठवण यावेळी आदित्य ठाकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना नाव न घेता करून दिली. 


तर छातीवर वार करून गेले नसतात....
आज राज्यात समस्या आज वासून उभ्या असून एकीकडे समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडली. त्यात आज पुन्हा धमकी आली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून मात्र कोणाला काही देणे घेणं नाही. तर मुख्यमंत्र्यांनी मलई खाल्ली, आता 40 गद्दाराचे काय? असा सवालही उपस्थित केला. तर माजी कृषिमंत्र्यांना काय दिले, कुठलं तरी खात काढलं आणि चिटकवून दिले. आम्ही दिवसरात्र मेहनत करून तुम्हाला जिंकून दिले. आता ते जिंकले, खोके त्यांनी खाल्ले, तुम्हाला काय मिळाले.
तुमच्यात एवढी हिम्मत होती तर छातीवर वार करून गेले नसतात अशी जहरी टीका त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. 


गद्दारांना बाबाजीका ठुल्लू मिळाला!
क्रांतीची नव्हे, गद्दारीची दखल घेतली, तुम्ही गद्दारी केली. तुम्हाला तिकडे राहायचं आहे. तिथे राहा. आता हे सांगत आहेत की 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली. पण तुमच्या क्रांतीची दखल घेतली नाही. उलट तुमच्या गद्दारी आणि निर्लज्जपणाची दखल घेतली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काही गद्दार आमच्याकडून गेले. त्यांना वाटलं बरंच काही मिळेल. पण त्यांना फक्त बाबाजी का ठुल्लू मिळाला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.