Ahmednagar News : राहता येथील गणेश सहकारी साखर कारखान्यात (Ganesh Sugar factory) विखे गटाचा दारुण पराभव झाला. याबाबत भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना विचारले असता, "सभासदांना काय योग्य वाटतं, त्यांना कोणाकडून अपेक्षा असते. त्यानुसार सभासदांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल आम्ही अतिशय नम्रपणे मान्य करत आहोत," असं म्हणाले. आपल्याला सत्ता परिवर्तन केलं पाहिजे, असे अनेक सभासदांना वाटले असेल पण बंद पडलेला तीन वर्षांचा कारखाना आम्ही चालू केला, तो प्रामाणिक चालेल, अशी आमच्या मनामध्ये भावना होती. मात्र मतदारांचा कौल वेगळा मिळाला. 


दरम्यान 25 वर्षांपूर्वीपासून हा कारखाना (Ganesh Sugar Factory) आमच्या विरोधातच राहिलेला आहे. त्यामुळे आता विरोधात निकाल गेल्याने वेगळे काही झाले असे नाही. जर प्रवरा कारखान्यात सत्तांतर झालं असतं तर चर्चेचा विषय झाला असता, पण या कारखान्यात सत्तांतर झाले तर वेगळे असे काही झाले नाही, असं सुजय विखे म्हणाले. "सहकारामध्ये राजकारण होऊ नये, ही आमची अपेक्षा होती, पण ते झालं. तिथे सभेमध्ये अनेक भाषण झाली. त्यातली वाक्यरचना, भाषण सर्व जनतेने ऐकली. मात्र त्या भाषणांमधून जिल्ह्याच्या जनतेला काय वाटतं, त्यात काय राजकारण आहे, ते जिल्ह्याचे नागरिक ठरवतील. त्यावर फार काही टीका टिप्पणी करण्यासारखं नाही," असंही ते म्हणाले.


दोस्ती को रिश्तेदारी में बदलने का वक्त आयेगा, तो रिश्तेदारी मे बदलेंगे


नुकताच विजय संपादन केलेल्या उमेदवारांना सल्ला देताना ते म्हणाले की, "विजयी झालेल्यांना जो आनंद झाला असेल, त्यांनी तो साजरा करावा. भविष्यामध्ये देखील आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत, ज्या पद्धतीने आम्ही कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने त्यांनीही कारखाना चालवावा, काही गरज पडली तर आम्ही देखील त्यांना मदत करायला तयार आहोत." पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी राहता येथे विजयी सभेत जोरदार भाषण केलं. विखे कुटुंबियांवर जोरदार टीका केली. याबाबत विचारले असता सुजय विखे यांनी हे उत्तर दिलं. 'दोस्ती को रिश्तेदारी में बदलने का वक्त आयेगा, तो रिश्तेदारी मे बदलेंगे. तब तक दोस्ती चलने दो...' असं सूचक वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे यांनी केले.


जिल्हा विभाजनाला सातत्याने विरोध 


नगर जिल्ह्यातील काही आजी-माजी आमदार तुमच्या संपर्कात आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुजय विखे बोलत होते की, पक्षश्रेष्ठी पक्षाच्या हितासाठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहिल. तर आत्ताच मला एक कॉल येऊन गेला, काळजी करु नका, योग्य वेळी सर्व काही होईल असं सुजय विखे म्हणाले. अहमदनगरच्या (Ahmednagar) जिल्हा विभाजनावर खासदार सुजय विखेंनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिर्डी येथे होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा विभाजनाशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर लोकांच्या सोयीसाठी केलेला हा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. तर जिल्हा विभाजनाला सातत्याने माझा विरोध राहिला आहे. कारण जिल्हा विभाजनाने जिल्ह्याची ताकद कमी होते, तसेच जिल्ह्याच्या एकत्रित करणारे जिल्ह्याचा फायदा असल्याचं सुजय विखे यांनी म्हटले आहे.