Vijaykumar Gavit : कनेक्टिव्हिटी नसल्याने राज्यातील आदिवासी बांधव (Trible Community) विकासापासून वंचित असून त्यातीलच कुपोषण (Malnutrition) हि सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी  सरकार आदिवासींच्या कनेक्टिव्हिटीवर काम करणार असून या माध्यमातून आदिवासींच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल अशी आशा नवनियुक्त कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Vijaykumar Gavit) यांनी व्यक्त केली आहे. 


शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात (Maharashtra Cabinet) डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश करण्यात आला असून त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. सध्या गावित हे नाशिकमध्ये (Nashik) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी उपस्थित असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील आदिवासी हा वंचित राहिला असून पायाभूत सुविधा देखील आदिवासींना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आदिवासी प्रथमता दळणवळणाच्या सोयी करून देणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयी झाल्यास त्यांचा शहराशी, तालुक्याशी संपर्क राहील. त्यांना रोजगार मिळेल आणि या माध्यमातून आपोआप आदिवासी बांधव विकसित होतील, अशा आशावाद यावेळी त्यावेळी त्यांनी व्यक्त केला. 


ते पुढे म्हणाले अनेक भागात आदिवासी पर्यंत पोहचण्याची साधने नाहीत, हि साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून मुख्य प्रवाहामध्ये यायला अडचण होणार नाही. कनेक्टिव्हिटी नसल्याने आरोग्य सुविधा नाही, रस्ते सुविधा नाही, वाहतुकीच्या सुविधा नाही, त्यामुळे आदिवासी विकासापासून वंचित आहे. अनेक वर्षापासून या अडचणी असून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यावर भर असेल. आदिवासी पट्ट्यात प्राथमिक दृष्ट्या कुपोषण हा खूप महत्त्वाचा विषय असून असून यावर काम करणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटी झाल्यास शिक्षण मुलांचे शिक्षण होईल, आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर युवकांना रोजगार मिळेल या गोष्टी प्रकर्षानं कनेक्टिव्हिटी आल्यानंतर होतील, असेही ते म्हणाले. 



नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून... 
मागील काही वर्षांत अनेक जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून काम केल आहे. गडचिरोली असेल, वाशीम असेल, त्यानंतर नंदुरबारला अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आता यापुढे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, तो मला मान्य असणार आहे. अतिदुर्गम भाग असलेले अविकसित जिल्हे यातील कुठल्याही जिल्ह्याचे काम करायला मिळाले तरी काम करायला तयार असल्याचे गावित यांनी सांगितले. तसेच नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काम करत आहे. 


अनेक वर्षापासून आदिवासी वंचित
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील आदिवासी हा वंचित राहिला असून पायाभूत सुविधा देखील आदिवासींना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आदिवासी प्रथमता दळणवळणाच्या सोयी करून देणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयी झाल्यास त्यांचा शहराशी, तालुक्याशी संपर्क राहील. त्यांना रोजगार मिळेल आणि या माध्यमातून आपोआप आदिवासी विकसित होण्यावर भर मिळेल. मुख्य प्रवाहामध्ये यायला अडचण होणार नाही. कनेक्टिव्हिटी नसल्याने आरोग्य सुविधा नाही, रस्ते सुविधा नाही, वाहतुकीच्या सुविधा नाही. त्यामुळे आदिवासी विकासापासून वंचित वर्षापासून या अडचणी असून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यावर भर असेल. 


दोन दिवसांत खाते वाटप!
येत्या दोन दिवसात खाते वाटप जाहीर होईल. कोणत्या मंत्राला कोणती खाते द्यायचे, याबाबत सध्या नियोजन सुरू आहे. अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळले आहेत. त्यामुळे कोणतेही खाते मिळाले तरी चालेल. तसेच लवकरच हे खातेवाटेत जाहीर होईल. अनेक खाते सांभाळले असल्याने पक्षश्रेष्ठी जे काही मला खाते देतील. ते खाते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करेन.